Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पंकजा मुंडे समर्थक अद्यापही नाराज?

वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवरुन भाजपा नेते गायब

बीड । वीरभूमी- Jul 25, 2021 • 12:00 AM 3287 views
भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांचा उद्या दि. 26 जुलै रोजी वाढदिवस आहे. पंकजा मुंडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी परळीत समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर लावले आहेत. मात्र या बॅनरवर एकाही भाजपा नेत्याचा फोटो नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एकीकडे पंकजा मुंडे समर्थकांची नाराजी दूर करुन भाजपाच्या केंद्रीय नेत्यांवर विश्वास ठेवा, असे सांगत असतांनाही समर्थक कार्यकर्ते अद्यापही नाराज दिसून येत आहेत.

नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात खा. प्रीतमताई मुंडे यांना डावलल्याने समर्थकांनी राजीनामे देत भाजपावरील नाराजी दाखवली होती. या नाराज समर्थकांची नाराजी दूर करण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी वरळी येथील कार्यालयात बैठक घेत संवाद साधला होता.

यावेळी पंकजा मुंडे यांनी समर्थकांची नाराजी दूर करत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. आपण आपले घर का सोडायचे. सध्या स्वल्पविराम द्या, पुर्ण विराम नव्हे. वेळआल्यावर पाहू काय करायचे ते, असे सांगत सर्व समर्थकांचे राजीनामे नामंजूर केले होते. त्यानंतर जिल्हानिहाय आढावा बैठक घेत समर्थकांची नाराजी दूर केली होती.

त्यातच सोमवार दि. 26 रोजी पंकजा मुंडे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी समर्थकांनी परळीत मोठ्या पमाणात डिजीटल बॅनर लावले आहेत. मात्र लावण्यात आलेल्या बॅनरवर भाजपा नेत्यांचे फोटो टाळले आहेत. कार्यकर्त्यांनी शुभेच्छा फलकावर फक्त स्व. गोपीनाथ मुंडे व मुंडे भगिणींचे फोटो टाकले आहेत.

या सर्व प्रकारावरुन अद्यापही मुंडे समर्थकांची नाराजी दूर झाली नसल्याचे अधोरेखीत होत आहे. आता यातून पुन्हा माजी मंत्री पंकजा मुंडे कसा मार्ग काढत समर्थकांची समजूत काढतात, याकडे राजकीय जाणकारांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply