Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

जिल्ह्यात आज कोरोनाचा महास्फोट

आकडेवारी हजारी पार । पारनेर टॉपवर, जामखेड दुसर्‍या तर शेवगाव तिसर्‍या स्थानी

अहमदनगर । वीरभूमी- Jul 25, 2021 • 12:00 AM 5121 views
अहमदनगर जिल्ह्यात आज रविवारी कोरोनाचा महास्फोट झाला आहे. आज आढळलेली कोरोना बाधितांची आकडेवारी हजाराच्या पुढे गेली आहे. आज रविवारी नगर जिल्ह्यात तब्बल 1026 कोरोना बाधित आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आज जिल्ह्यात कोरोनाचा महास्फोट झाला असून पुन्हा एकदा पारनेर तालुका टॉपवर आहे. पारनेरने आज दोनशेचा आकडा पार केला आहे. तर जामखेड दुसर्‍या स्थानी असून 180 चा आकडा गाठला आहे. तसेच शेवगाव तिसर्‍या स्थानी आले असून 97 चा आकडा गाठला आहे.

नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हजाराचा आकडा पार केला आहे. याला कारणीभूत ठरत आहेत ते विवाह सोहळे व राजकीय कार्यक्रम. मात्र प्रशासन व नागरिक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

कासवगतीने वाढत असणार्‍या रुग्णसंख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 246, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 398 तर अँटीजेन चाचणीत 382 असे 1026 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 210, जामखेड 180, शेवगाव 97, कर्जत 74, संगमनेर 70, नगर ग्रामीण 66, नेवासा 59, पाथर्डी 59, अकोले 52, राहुरी 43, राहाता 26, नगर शहर 23, कोपरगाव 19, श्रीरामपूर 19, श्रीगोंदा 17, इतर जिल्हा 12 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply