Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेवगाव तालुका प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

नियम मोडणार्‍या दुकानदारांवर तहसीलदारांची दंडात्मक कारवाई

शेवगाव । वीरभूमी- Jul 29, 2021 • 12:00 AM 3114 views
जिल्ह्यात व तालुक्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी शेवगाव तालुका प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. नियमाचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांसह व्यावसायिकांवर कारवाई करत दंड वसूल करण्यात येत आहे.

बुधवारी तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या पथकाने निर्धारीत वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवणार्‍या सहा दुकानाच्या मालकांसह मास्क न घातलेल्या 7 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली आहे. व्यावसायिक व नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार अर्चना पागिरे यांनी केले आहे.

मागील आठवड्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. शेवगाव तालुक्यातही आकडेवारीचे प्रमाण कासवगतीने वाढत आहे. कोरोना बाधितांची आकडेवारी आटोक्यात ठेवण्यासाठी तालुका प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.

शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी पोलिस प्रशासन व शेवगाव नगरपालिका प्रशासन यांच्या मदतीने शेवगाव शहरात नियम मोडणार्‍यांवर बुधवारी धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवणार्‍या सहा दुकान मालकांवर कारवाई करत तीन हजार रुपयाचा दंड वसूल केला. तर शहरात विनामास्क फिरणार्‍या 7 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत 1400 रुपयाचा दंड वसूल केला आहे.

तालुका प्रशासनाने आतापर्यंत मास्क न घालणार्‍या 4 हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच नियम मोडणारी मंगल कार्यालये, लॉन्स, दुकाने, हॉटेल व्यावसायिक, खाजगी अस्थापने यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करत दंड वसूल केला आहे.

यापुढे नियम मोडणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित तोंडाला मास्क लावावा. व्यावसायिकांनी आपली दुकाने शासनाने ठरवून दिलेल्या निर्धारीत वेळेतच उघडी ठेवावी, अन्यथा दुकानांवर सीलबंदची कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply