Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

वाढता वाढे कोरोनाचा आकडा

संगमनेरचा आजही उच्चांक; कर्जत, पारनेर दुसर्‍या तर शेवगाव तिसर्‍या क्रमांकावर

अहमदनगर । वीरभूमी- Jul 30, 2021 • 12:00 AM 2449 views
गेल्या तीन-चार दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ झालेली दिसते. आज शुक्रवारी जिल्ह्यात तब्बल 918 कोरोना बाधित आढळले. आकडेवारी कमी होत नसल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

आज शुक्रवारी गुरुवारच्या तुलनेत आकडेवारीमध्ये फक्त 02 ने घट झाली आहे. आजही संगमनेरने आपला प्रथम क्रमांक कायम राखला आहे. मात्र कर्जत, पारनेरच्या आकडेवारीत वाढ झाल्याने ते दुसर्‍या स्थानावर आले आहेत. तर शेवगावची आकडेवारी आज कमी झाली असली तरी तिसरा क्रमांक राहीला आहे.

शेवगाव पाठोपाठ जामखेड, पाथर्डी, श्रीगोंदा असा क्रमांक लागतो. नगर उत्तर जिल्ह्यातील संगमनेर वगळता इतर तालुक्याची आकडेवारी दक्षिणेतील तालुक्याच्या तुलनेत कमी आहे. मात्र दक्षिणेतील नगर शहर वगळता इतर तालुक्यात कोरोना संसर्ग वाढल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.

वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून दंडात्मक कारवाईला प्रारंभ केला आहे. यामुळे नागरिकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 121, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 418 तर अँटीजेन चाचणीत 379 असे 918 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 109, कर्जत 102, पारनेर 102, शेवगाव 93, जामखेड 67, पाथर्डी 66, श्रीगोंदा 63, नगर ग्रामीण 47, अकोले 46, राहाता 42, राहुरी 37, नेवासा 34, कोपरगाव 30, श्रीरामपूर 30, नगर शहर 24, इतर जिल्हा 23, भिंगार 03 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply