Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शनिवारच्या तुलनेत रविवारचा आकडा घटला

संगमनेर, जामखेड, शेवगाव शंभरीवर । चिंता कायम

अहमदनगर । वीरभूमी- Aug 01, 2021 • 12:00 AM 1990 views
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत असतांना आज आढळलेल्या आकडेवारीत थोडीशी घट झाली आहे. आज रविवारी जिल्ह्यात 943 कोरोना बाधित आढळले. आकडा घटला असला तरी नगरकरांची चिंता कायम आहे.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये संगमनेरने आपला प्रथम क्रमांक कायम राखला आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर जामखेडने उडी घेतली आहे. तर शेवगाव मागील प्रमाणे क्रमांक तीनवर आहे.

गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ होत होती. मात्र आज रविवारी यामध्ये थोडीशी घट झाली आहे. मात्र हा आकडा 943 असल्याने चिंता कायम आहे. याला नागरिकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत ठरत आहे.

वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली तरीही कोरोना बाधितांचा आकडा कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 65, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 469 तर अँटीजेन चाचणीत 409 असे 943 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 128, जामखेड 103, शेवगाव 100, श्रीगोंदा 82, कर्जत 80, पारनेर 78, पाथर्डी 56, राहुरी 54, श्रीरामपूर 49, राहाता 40, नेवासा 37, अकोले 36, कोपरगाव 32, नगर ग्रामीण 28, इतर जिल्हा 23, नगर शहर 16, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply