Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

मंगळवारही दिलासादायक; आकडेवारीत घट

संगमनेर टॉपवर, शेवगाव दुसर्‍या व पाथर्डी तिसर्‍या स्थानावर

अहमदनगर । वीरभूमी- Aug 03, 2021 • 12:00 AM 3543 views
अहमदनगर जिल्ह्याला गेल्या दोन-तीन दिवसापासून दिलासा मिळत आहे. आज मंगळवारीही कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये घट झाली आहे. आज जिल्ह्यात एकुण 761 कोरोना बाधित आढळले.

राज्यातील अनेक जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी घटल्यामुळे निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. मात्र अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिव्हीटी रेट जास्त असल्यामुळे निर्बंधात कुठल्याही प्रकारची सूट मिळाली नाही. उलट वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्या पातळीवर नियमांत बदल करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये संगमनेर तालुका आजही टॉपवरच राहीला आहे. तर शेवगाव दुसर्‍या स्थानावर तर पाथर्डी तिसर्‍या स्थानावर आले आहेत. कोरोना बाधितांची एकुण आकडेवारीत घट झाली असली तरी काही तालुक्यांतील आकडेवारी मात्र वाढली आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 17, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 363 तर अँटीजेन चाचणीत 381 असे 761 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 148, शेवगाव 80, पाथर्डी 65, जामखेड 59, पारनेर 57, कर्जत 50, नेवासा 45, श्रीरामपूर 44, राहुरी 40, अकोले 37, श्रीगोंदा 36, राहाता 35, नगर ग्रामीण 29, कोपरगाव 15, नगर शहर 13, इतर जिल्हा 8 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply