Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट

संगमनेर, पारनेर, शेवगाव शंभरी पार । चिंता वाढली

अहमदनगर । वीरभूमी- Aug 13, 2021 • 12:00 AM 3155 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आज उच्चांक झाला आहे. आज शुक्रवारी जिल्ह्यात तब्बल 1155 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे नगर जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांची आकडेवारी कमी जास्त होत असतांना आज शुक्रवारी कोरोना बाधितांच्या आकड्याचा विस्फोट झाला आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर 162, पारनेर 137, शेवगाव 112 तर इतर तालुके शंभरच्या आत आले आहेत. मात्र राहाता तालुका वगळता इतर तालुक्यातील आकडेवारीत वाढ झाली आहे. आज अचानक वाढलेल्या आकडेवारीने चिंता वाढली आहे.

नुकतीच राज्य शासनाने दि. 15 ऑगस्ट पासून निर्बंध शिथील करण्याची घोषणा करत नव्याने निर्बंधाचे नियम जाहीर केले. मात्र त्यानंतर दुसर्‍याच दिवशी नागरिकांच्या बेजबाबदार पणामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित आकड्याचा विस्फोट झाला आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 270, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 524 तर अँटीजेन चाचणीत 361 असे 1155 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 162, पारनेर 137, शेवगाव 112, अकोले 95, नगर ग्रामीण 91, श्रीगोंदा 84, पाथर्डी 72, कर्जत 71, जामखेड 68, राहुरी 60, श्रीरामपूर 48, नेवासा 45, नगर शहर 35, राहाता 31, कोपरगाव 28, इतर जिल्हा 15, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply