Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

आकडा घटला, चिंता कायम

संगमनेर, पारनेर शंभरच्या पुढे । राहुरी, जामखेड वगळता इतर आकडा घटला

अहमदनगर । वीरभूमी- Sep 01, 2021 • 12:00 AM 1566 views
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कोरोना (corona) बाधितांच्या आकड्यामध्ये आज मंगळवारच्या तुलनेते 128 ने घट झाली आहे. मात्र जिल्ह्याचा एकुण आकडा 736 असल्याने चिंता कायम आहे. यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर (sangamner) व पारनेर (parner) तालुके शंभरच्या पुढे आहेत. मात्र राहुरी (rahuri), जामखेड (jamkhed), इतर जिल्हा व नगर ग्रामीण वगळता इतर तालुक्याची आकडेवारी मंगळवारच्या तुलनेत घटली आहे. यामुळे काहीअंशी दिलासा मिळत असला तरी चिंता कायम आहे.

आज बुधवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 224, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 308 तर अँटीजेन चाचणीत 204 असे 736 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 167, पारनेर 122, अकोले 69, श्रीगोंदा 63, नगर ग्रामीण 47, पाथर्डी 45, राहाता 34, शेवगाव 32, जामखेड 31, राहुरी 27, नगर शहर 23, कर्जत 22, नेवासा 19, कोपरगाव 14, इतर जिल्हा 10, श्रीरामपूर 10, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

कोरोना संगर्स रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नियमित स्वच्छ हात धुवावे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply