Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

जिल्ह्यातील बाधितांचा आकडा चिंता वाढवणाराच

संगमनेरची चिंता कायम । पारनेर, अकोले पाठोपाठ पाथर्डीचा क्रमांक

अहमदनगर । वीरभूमी- Sep 05, 2021 • 12:00 AM 2051 views
अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar district) कोरोना बाधितांचा (corona sufferers) आकडा काही केल्या घटत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज रविवारी अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar district) तब्बल 723 कोरोना बाधित आढळले आहे.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये संगमनेरचा (Sangmner) आकडा 160 वर असल्याचे चिंता कायम आहे. त्याचप्रमाणे संगमनेर पाठोपाठ पारनेर (parner), अकोले (akole) व पाथर्डीचा (pathardi) क्रमांक लागतो. तर कोपरगाव (kopargaon), भिंगारची आकडेवारी एक अंकी असल्याने दिलासा मिळत आहे.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 197, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 308 तर अँटीजेन चाचणीत 218 असे 723 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 160, पारनेर 86, अकोले 85, पाथर्डी 78, श्रीगोंदा 48, राहाता 45, नगर शहर 38, नगर ग्रामीण 34, नेवासा 30, शेवगाव 29, राहुरी 25, श्रीरामपूर 20, जामखेड 16, कर्जत 16, इतर जिल्हा 07, कोपरगाव 05, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

कोरोना संगर्स रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नियमित स्वच्छ हात धुवावे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply