Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

गाव गुंडाच्या मारहाणीला घाबरुन वृद्धाची आत्महत्या

शेवगाव तालुक्यात खळबळ । गदेवाडी येथील तीघांवर गुन्हा दाखल

शेवगाव । वीरभूमी- Sep 10, 2021 • 12:00 AM 5262 views
दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणुन गाडीमधून पळवून नेत वृद्धाला शिवीगाळ करत जबर मारहाण करण्यात आली. गावगुंडाच्या या दशहतीला घाबरुन वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथे घडली.

आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव विनायक किसन मडके (रा. गदेवाडी, ता. शेवगाव) असे आहे. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात तीन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली हकीगत अशी की, शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील विनायक किसन मडके हे आठ दिवसापूर्वी घोड्यावरून आपल्या शेतात चालले असता फर्च्युनर गाडीतून जाणार्‍या मुकेश दत्तात्रय मानकर, रुपेश दत्तात्रय मानकर व मच्छिंद्र एकनाथ धनवडे (सर्व रा. गदेवाडी, ता. शेवगाव) यांनी कट मारला होता. त्यावेळी विनायक मडके यांनी याचा जाब विचारला असता वरील तीघांनी शिवीगाळ केली होती.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी विनायक मडके हे गदेवाडी गावात गेले असता पुन्हा वरील तिघांनी त्यांना दारुसाठी पैसे मागितले. विनायक मडके यांनी त्यांना पैसे न दिल्याने शिविगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

विनायक मडके हे घरी आल्यानंतर त्यांनी हा सर्व प्रकार घरच्या व्यक्तींना सांगितला होता. त्यानंतर दि. 9 सप्टेंबर रोजी रात्री 9.15 वाजेच्या सुमारास आरोपी मुकेश मानकर, रुपेश मानकर व मच्छिंद्र धनवडे यांनी फर्च्युनर गाडी (क्रमांक 2223) मधून येऊन विनायक मडके यांना हाका मारुन घरातून बोलावून घेतले. ते गाडीजवळ येताच त्यांचा घातपात करण्याच्या उद्देशाने त्यांना गाडीत बसवून घेऊन गेले. त्यावेळी विनायक मडके यांचा मुलगा तुळशिराम मडके याने प्रतिकार केला असता त्यालाही शिविगाळ करत धक्काबुक्की केली.

यावेळी वरील तिघांनी तुझ्या वडीलांना आज जीवे सोडत नाही, असे म्हणुन दमदाटी करून घेऊन गेले. त्यानंतर विनायक मडके यांचा शोध घेतला असता सुयोग हॉटेल समोर मुकेश मानकर, रुपेश मानकर व मच्छिंद्र धनवडे हे तिघे विनायक मडके यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत होते.

दरम्यान हे पाहुन तुळशिराम मडके याने भावाला फोन करून बोलावून घेतले. त्यावेळी शोध घेतला विनायक मडके यांनी हॉटेल सुयोगच्या पाठीमागे असलेल्या बोरीच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले.

त्यानंतर त्यांना खाली उतरून शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी विनायक मडके हे मयत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी तुळशिराम विनायक मडके (वय 30, रा. गदेवाडी, ता. शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकेश दत्तात्रय मानकर, रुपेश दत्तात्रय मानकर व मच्छिंद्र एकनाथ धनवडे (सर्व रा. गदेवाडी, ता. शेवगाव) यांच्यावर भादंवि कलम 306, 364, 385, 279, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास शेवगावचे पोनि. प्रभाकर पाटील हे करत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply