Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

कर्जत-जामखेडमध्ये भाजपाला मोठा धक्का

नामदेव राऊत यांचा सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा । राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता

डॉ. अफरोजखान पठाण । वीरभूमी- Sep 18, 2021 • 12:00 AM 2693 views
कर्जत ः कर्जत-जामखेड मतदारसंघात पुन्हा खळबळ उडाली असून भाजपाचे नेते तथा कर्जत पालिकेचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आपल्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. नामदेव राऊत यांच्या राजीनाम्यामुळे कर्जत भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

आपल्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीशी चर्चा झाल्याचे सांगत सहकार्यासह निर्णय घेऊ असे सांगितले. यामुळे आगामी काळात कर्जतच्या राजकारणात भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नामदेव राऊत यांनी दिलेल्या राजीनाम्यामध्ये म्हटले आहे की, अनेक वर्ष भाजपाच्या विचारधारेप्रमाणे काम करत असतांना भरीव असे काम केले आहे. या काळात अनेक जीवाचे मित्र मिळाले असून खूप काही शिकण्यास मिळाले आहे.

भाजपात काम करत असतांना राम शिंदे, खा. सुजय विखे, शिवाजी कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, स्व. दिलीप गांधी, सुवेंद्र गांधी अ‍ॅड. अभय आगरकर आदींचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. राम शिंदे यांच्या कामाबद्दल व त्यांनी सहकार्याबद्दल मी समाधानी असल्याचे सांगत दिलेल्या राजीनाम्याचा स्वीकार करावा, असे म्हटले आहे.

नामदेव राऊत यांनी राजीनामा दिल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी सांगितले की, मी भाजपा पक्षात कोणावरही नाराज नाही. राष्ट्रवादीच्या कामाची पद्धत समाधानकार असून राष्ट्रवादीशी आपली चर्चा झाली आहे. यामुळे सहकार्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले.

यामुळे नामदेव राऊत हे राष्ट्रवादी पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नामदेव राऊत यांनी भाजपात विविध पदावर काम करत शेवगाव पालिकेसाठी पक्ष निरिक्षक म्हणुन काम केलेले आहे. यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपाला चांगलाच धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply