Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान बिबट्याचा मृत्यू

शिकार्‍याच्या जाळ्यात अडकला होता बिबट्या

श्रीगोंदा । वीरभूमी- Sep 20, 2021 • 12:00 AM 3527 views
श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथील डोमाळवाडीतील मदनेवस्तीजवळ भुजबळ यांच्या गट. नं. 93 मधील शेतात शिकार्‍यांनी जंगली प्राणी पकडण्याच्या उद्देशाने सापळा लावला होता. रविवार दि. 19 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या सापळ्यात अडकून सुटका करण्याच्या धडपडीत जखमी झाल्याने बिबट निवारा केंद्रावर जाण्याआधीच त्याचा मृत्यू ओढवला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वांगदरी शिवारात मदनेवस्ती येथील गट नं.93 मधील शेतात जंगली प्राण्याच्या शिकारीच्या उद्देशाने अज्ञात शिकार्‍यांनी जाळे लावून सापळा रचला होता. या परिसरात ऊसाची शेती आहे. भक्ष्याच्या शोधात निघालेला बिबट्या अचानक या जाळ्यात सापडला.

बिबट्याला पाहून परिसरातील शेतकर्‍यांनी वनविभागाला तात्काळ कळवले. बिबट्याची सुटका करण्यासाठी जिल्हा वन अधिकारी सुवर्णा माने यांनी मोबाईल स्कॉड, माणिकडोह येथील वन्यप्राणी बचाव पथक व पोलिसांना पाचारण केले.

या रेस्क्यू टीमने बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन जुन्नर येथील बिबट निवारा केंद्राकडे पुढील उपचारासाठी नेत असताना वाटेतच बेलवंडी नजीक त्याचा मृत्यू झाला. बेलवंडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले.

शवविच्छेदनात प्राथमिक अहवालानुसार बिबट्या जखमी अवस्थेत असल्याने भूक व मोठ्या प्रमाणात निर्जलीकरण झाल्याने मृत्यू ओढवल्याचा निष्कर्ष निघाला आहे.

या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये जिल्हा वन अधिकारी सुवर्णा माने, कर्जत तेथील वनपरिक्षेत्रपाल मोहन शेळके, श्रीगोंदा येथील वनपरिक्षेत्रपाल भोगे साहेब, सहाय्यक वनसंरक्षक देवखिळे, वनकर्मचारी गुंजाळ, घालमे यांनी सहभाग घेतला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply