Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

शेवगाव तहसील कार्यालयातूनच तिसर्‍या लाटेला आमंत्रण

तहसीलदारांच्या निरोप व स्वागत समारंभाला कोरोनाचा पडला विसर

शेवगाव । वीरभूमी - Sep 22, 2021 • 12:00 AM 2948 views
दोन दिवसापुर्वीच विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी कोरोना उपाययोजना आढावा बैठक घेऊन प्रशासनाला मास्क न वापरणे, गर्दी करणे व नियम मोडणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र कोरोना नियमांची पायमल्ली करत शेवगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात नवीन तहसीलदारांचे स्वागत तर जुन्या तहसीलदारांना निरोप देण्यात आला.

एवढेच नव्हे तर निरोप व स्वागत समारंभानंतर जेवणावळीही उठल्या. दोन महिण्यापुर्वी नियमांचा भंग करणार्‍या नवरदेव, नवरीसह आई-वडिलांवर व लॉन्स मालकावर गुन्हे दाखर करत कारवाई करणार्‍या महसूल प्रशासनानेच नियम मोडल्याने कोण कारवाई करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांची बदली होऊन त्यांच्या जागेवर नूतन तहसीलदार म्हणुन छगन वाघ यांची नेमणुक झाली आहे. यामुळे शेवगाव तहसील कार्यालयातील सभागृहात जुन्या तहसीलदारांना निरोप व नूतन तहसीलदारांचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र हा कार्यक्रम घेतांना कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

हा कार्यक्रम महसूल संघटनेच्या पुढाकारातून झाला. या कार्यक्रमाला शेवगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी, निवासी नायब तहसीलदार, नायब तहसीलदार अव्वल कारकून, मंडलाधिकारी, तलाठी व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चांगले काम केल्याने तहसीलदार व महसूल कर्मचार्‍यांचे कौतूक होत असतांना अशी नियमांची पायमल्ली केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

विभागिय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या होत्या. एवढेच नाही तर कोरोनाची तिसरी लाट अहमदनगर जिल्ह्यातून येण्याची भिती व्यक्त करत प्रशासनाला नियम मोडणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र याच सुचनांची वरीष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीतच पायमल्ली केल्याने यांच्यावर कारवाई कोण करणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply