Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

कोरोना बाधितांचा आकडा कायम

नगर शहरासह राहाता, शेवगाव, नगर ग्रामीण, नेवासा, पाथर्डी, श्रीरामपूरच्या आकडेवारीत वाढ

अहमदनगर । वीरभूमी- Sep 30, 2021 • 12:00 AM 1883 views
अहमदनगर जिल्ह्यात आज गुरुवारी एकुण 623 कोरोना बाधित आढळले. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा स्थिर राहीला आहे. मात्र काही तालुक्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर तालुका टॉपवर असला तरी आजची आकडेवारी बुधवारच्या तुलनेत घटली आहे. आज सर्वच तालुक्यातील आकडेवारी शंभरच्या आता आहे. मात्र राहाता, शेवगाव, नगर ग्रामीण, नेवासा, पाथर्डी, नगर शहर, श्रीरामपूर, राहुरी, इतर जिल्हा येथील आकडेवारीत वाढ झाली आहे.

संगमनेर, पारनेरला दिलासा मिळाला असला तरी इतर तालुक्यांची आकडेवारी वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी लसीकरण करून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये राहुरी, जामखेड तालुके एक अंकी असून भिंगार, मिलटरी हॉस्पिटलची आकडेवारी शुन्यावर आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची आकडेवारी घटत चालल्याने समाधान व्यक्त होत आहे. अशीच परिस्थिती राहीली तर लवकरच संपूर्ण अहमदनगर जिल्हा कोरोनामुक्त होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 115, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 321 तर अँटीजेन चाचणीत 187 असे 623 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 90, राहाता 87, शेवगाव 61, पारनेर 57, नगर ग्रामीण 42, नेवासा 38, कर्जत 36, पाथर्डी 35, नगर शहर 33, श्रीरामपूर 26, श्रीगोंदा 25, राहुरी 24, इतर जिल्हा 22, कोपरगाव 19, अकोले 17, जामखेड 10, मिलटरी हॉस्पिटल 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

राज्यातील इतर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी घटत असतांना अहमदनगर जिल्ह्यातील बाधितांचा आकडा घटत नाही.नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना बाधितांचा आकडा घटत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply