Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जिल्ह्यातील देवदर्शनासाठी प्रशासनाकडून नियमावली जाहीर

लहान बालके, गरोदर स्त्रीया, वयोवृद्ध व आजारी व्यक्तींना प्रवेश नाही

अहमदनगर । वीरभूमी- Oct 05, 2021 • 12:00 AM 3415 views
राज्य शासनाने दि. 7 ऑक्टोबरपासून मंदिरे व धार्मीक स्थळे उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील धार्मीक स्थळे उघडणार असली तर जिल्ह्यातील देवस्थांमध्ये 10 वर्षाखालील बालके, गरोदर स्त्रीया, 65 वर्षावरील, आजारी व्यक्तींना तसेच मास्क न वापरणार्‍या व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

तसेच मंदिर परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांना रात्री 8.30 वाजेनंतर बंद करण्यात याव्यात असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

याबाबत शिर्डी येथे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत पोलिस अधिक्षक, उपविभागिय पोलिस अधीकारी, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, सर्व विभागाचे उपविभागिय अधिकारी, देवस्थान समितीचे मुख्याधिकारी, व्यवस्थापन मंडळ यांची बैठक घेऊन विविध सुचना देण्यात आल्या.

या बैठकीत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी म्हटले की, शासनाने ठरवून दिलेल्या सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. दर्शन घेतांना प्रत्येकाने 6 फुटाचे अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा व वारंवार हात स्वच्छ धुवावे. भाविकांना मंदिरात प्रवेश देतांना त्यांची थर्मल स्कॅनिंगद्वारे शरीराचे तापमान तपासले जाणार आहे. कोरोना संसर्गाची लक्षणे आढळणार्‍या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

तसेच 10 वर्षाखालील बालके, गरोदर स्त्रीया, 65 वर्षावरील वयोवृद्ध व आजारी व्यक्ती तसेच मास्क न लावणार्‍या व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

तसेच मंदिरात प्रवेश करतांना कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र देण्याची सक्ती केली जाणार नाही. मात्र मंदिरात प्रवेश करतांना पुजा साहित्य आणू नये. पुजा साहित्य असल्यास मंदिरात प्रवेश दिला जाणारा नाही. मात्र जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply