Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

कोयत्याने वार करत अल्पवयीन मुलीची सर्वांसमक्ष हत्या

कोयत्याने वार करत अल्पवयीन मुलीची सर्वांसमक्ष हत्या

पुणे । वीरभूमी- Oct 12, 2021 • 12:00 AM 3499 views
लहान मुले खेळत असतांना अल्पवयीन मुलीची क्रुरपणे कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना पुणे येथील बिबवेवाडी येथे आज सायंकाळच्या सुमारास घडली. या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलीची हत्या ही एकतर्फी प्रेमातून झाल्याची शंका व्यक्त केली जात असून आरोपी हा नात्यातीलच असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी हा मुलीची हत्या करत असतांना तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी तेथून पळ काढला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पुण्यातील बिबवेवाडी येथील मैदानावर काही मुली कबड्डीचा सराव करत होत्या. त्या दरम्यान तेथे खेळत असलेल्या एका अल्पवयीन मुलीकडे तिघे जण आले. यातील एकाच्या हातात कोयता होता. हातात कोयता असलेल्या तरुणांने अचानक त्या अल्पवयीन मुलीवर सपासप वार केले.

थोड्याच वेळात मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली. तरीही तो तरून त्या मुलीवर कोयत्याने सपासप वार करत होता. तो मुलीचे मुंडके शरीरापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत होता. कारण आरोपीने कोयतयाच्या साह्याने मानेवरच सपासप वार केले आहेत.

ही घटना खेळच्या मैदावरच झाल्याने एकच गोंधळ उडाला. अनेकांनी घटना पहाताच तेथून पळ काढला. मुलीची हत्या करणार्‍यांकडे कोयत्यासह एक पिस्तुलही होते. आरोपीने मुलीची हत्या केल्यानंतर हातातील पिस्तूल तेथेच टाकून पळ काढला.

या धक्कादायक घटनेने पुण्यासह अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातून घडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply