Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जिल्ह्यातील आकडेवारीत घट कायम

नगर शहरासह संगमनेर, कर्जत, पारनेर, पाथर्डीची आकडेवारी वाढली

अहमदनगर । वीरभूमी- Oct 14, 2021 • 12:00 AM 1479 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत आजही घट झाली आहे. बुधवारच्या तुलनेत आज एकुण कोरोना बाधितांच्या आकडेवारीत एकने घट झाली आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात एकुण 318 कोरोना बाधित आढळले आहेत.

आज आढळलेल्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीत पुन्हा संगमनेर पहिल्या क्रमांकावर आले आहे. बुधवारच्या तुलनेत संगमनेरसह कर्जत, पारनेर, नगर शहर, पाथर्डी, इतर जिल्हा येथील आकडेवारीत वाढ झाली आहे. वाढत्या आकडेवारीने काही अंशी चिंता व्यक्त केली जात आहे.

हळु हळु अहमदनगर जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. बुधवारी जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांच्या संख्येत शंभरने घट झाल्याने अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या 2 हजार 575 वर आली आहे. आतापर्यंत तब्बल 3 लाख 41 हजार 344 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 82, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 200 तर अँटीजेन चाचणीत 36 असे 318 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 65, कर्जत 36, पारनेर 27, नगर ग्रामीण 23, राहाता 20, राहुरी 18, नगर शहर 16, नेवासा 16, शेवगाव 16, इतर जिल्हा 15, पाथर्डी 15, अकोले 12, श्रीगोंदा 11, कोपरगाव 10, श्रीरामपूर 09, जामखेड 07, मिलटरी हॉस्पिटल 02 असे कोरोना बाधित आढळून आले.

मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील एकुण आकडेवारीत घट होत असल्याने दिलासा मिळत आहे. नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केल्यास लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply