Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

मोठा दिलासा ः जिल्ह्यातील आकडेवारीत कमालीची घट

सर्व ठिकाणच्या आकडेवारीत मोठी घट

अहमदनगर । वीरभूमी- Oct 16, 2021 • 12:00 AM 2418 views
अहमदनगर जिल्ह्याचा आज शनिवारी मोठा दिलासा मिळाला आहे. आज जिल्ह्यात एकुण 258 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे नगर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने होत असल्याचे दिसत आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र येथील आकडेवारी 49 च्या आत असल्याने समाधान मिळत आहे. दुसर्‍या स्थानावर पारनेर तालुका असून पारनेरची आकडेवारी शुक्रवारच्या तुलनेत एकने वाढली आहे.

आज आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीत विशेष म्हणजे पारनेर वगळता इतर तालुक्यांच्या आकडेवारीत मोठी घट झाली आहे. तसेच नगर ग्रामीण, नेवासा, इतर जिल्हा, शेवगाव, श्रीरामपूर, जामखेड, पाथर्डी येथील आकडेवारी एक अंकी आली आहे. यामुळे नगरकरांना मोठा दिलासा मिळत आहे.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 85, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 139 तर अँटीजेन चाचणीत 34 असे 258 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 49, पारनेर 37, राहाता 32, राहुरी 22, नगर शहर 16, अकोले 15, कोपरगाव 12, कर्जत 11, नगर ग्रामीण 9, नेवासा 8, इतर जिल्हा 8, शेवगाव 6, श्रीरामपूर 5, जामखेड 3, पाथर्डी 3 असे कोरोना बाधित आढळून आले.

अहमदनगर जिल्ह्यातील एकुण आकडेवारीत घट झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र तरीही नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply