Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

नगरकरांना आजही मोठा दिलासा

एकुण आकडेवारीत घट । काही ठिकाणच्या आकडेवारीत थोडीशी वाढ

अहमदनगर । वीरभूमी- Oct 17, 2021 • 12:00 AM 1882 views
अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाश्यांना आजही मोठा दिलासा मिळत आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये आजही मोठी घट झाली आहे. आज रविवारी जिल्ह्यात एकुण 226 कोरोना बाधित आढळले.

आज आढळलेल्या बाधितांची संख्या धमी असली तर कोपरगाव तालुक्यात शनिवारच्या तुलनेत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, शेवगाव जामखेड, श्रीरामपूर, नगर ग्रामीण येथील आकडेवारीत थोडीशी वाढ झाली आहे. यामुळे काही प्रमाणात चिंता व्यक्त होत आहे.

नेहमी मोठा आकडा असलेल्या संगमनेर, पारनेर तालुक्यांना आज दिलासा मिळाला. मात्र इतर ठिकाणची आकडेवारीत थोडीशी वाढ झाल्याचे दिसत आहे. यामुळे या तालुक्यात काळजी घेण्याची गरज आहे.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 71, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 88 तर अँटीजेन चाचणीत 67 असे 226 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- राहाता 28, कोपरगाव 23, श्रीगोंदा 23, कर्जत 21, पारनेर 17, अकोले 16, राहुरी 16, नगर शहर 14, नगर ग्रामीण 14, संगमनेर 13, श्रीरामपूर 12, नेवासा 10, शेवगाव 07, जामखेड 06, इतर जिल्हा 03, पाथर्डी 03 असे कोरोना बाधित आढळून आले.

जिल्ह्यातील एकुण आकडेवारीत घट झाली तरी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून कोरोना प्रतिबंधक लसीकरण घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply