Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

नगरकरांचे एक पाऊल कोरोनामुक्तीकडे

सर्व ठिकाणची आकडेवारी 34 च्या आत । आठ ठिकाणची आकडेवारी 8 च्या आत

अहमदनगर । वीरभूमी- Oct 21, 2021 • 12:00 AM 1632 views
मागील आठवड्यापासून नगर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळत आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळणार्‍या जिल्ह्याच्या यादीत अहमदनगरचा समावेश होत होता. मात्र नागरिकांचा संयम व प्रशासनाचे नियोजन यामुळे मागील आठवड्यापासून नगर जिल्ह्यातील बाधितांचा आकडा कोरोनामुक्तीकडे जात आहे. यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

आज गुरुवारी जिल्ह्यात एकुण फक्त 201 कोरोना बाधित आढळले आहेत. आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वात जास्त संगमनेरची आकडेवारी असून ती 34 एवढी आहे. तर नगर शहरासह आठ ठिकाणची आकडेवारी 8 पेक्षा कमी आहे.

काल बुधवार पर्यंत जिल्ह्यात तब्बल 3 लाख 52 हजार 752 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी तब्बल 3 लाख 43 हजार 887 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर उपचार सुरू असतांना जब्बल 6 हजार 985 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर झाली आहे. तर सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 880 एवढी झाली आहे.

आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 102, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 65 तर अँटीजेन चाचणीत 34 असे 201 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 34, श्रीगोंदा 29, राहाता 28, कोपरगाव 19, नगर ग्रामीण 18, पारनेर 17, अकोले 12, कर्जत 10, नगर शहर 8, शेवगाव 7, पाथर्डी 5, राहुरी 5, श्रीरामपूर 5, नेवासा 2, जामखेड 1 असे कोरोना बाधित आढळून आले.

कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र बाधितांचा आकडा कमी होत असला तरी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यामध्ये नियमित मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply