Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

चिंता वाढली ः कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ

चिंता वाढली ः कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ

अहमदनगर । वीरभूमी- Oct 26, 2021 • 12:00 AM 2478 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असतांना आज मंगळवारी पुन्हा 103 ने वाढली आहे. आज मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यात एकुण 200 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे पुन्हा चिंता व्यक्त होत आहे.

सोमवारी अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची शंभरच्या आत आली होती. मात्र आज पुन्हा 103 ने वाढ होत हा आकडा 200 वर पोहोचला आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये कर्जत व पारनेरचा आकडा सर्वाधिक आहे.

सोमवारी शुन्य रुग्ण संख्या आढळलेल्या पाथर्डीत पुन्हा रुग्ण संख्या 6 वर आली आहे. पाथर्डी बरोबरच सुमारे सर्वच ठिकाणची आकडेवारीत वाढ झाल्याचे दिसत आहे.

आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 77, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 82 तर अँटीजेन चाचणीत 41 असे 200 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- कर्जत 24, पारनेर 24, राहाता 17, नगर ग्रामीण 16, राहुरी 16, श्रीगोंदा 16, कोपरगाव 15, संगमनेर 13, नगर शहर 12, अकोले 10, नेवासा 8, इतर जिल्हा 8, शेवगाव 8, पाथर्डी 6, श्रीरामपूर 4, जामखेड 2, मिलटरी हॉस्पिटल 1 असे कोरोना बाधित आढळून आले.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट होत असतांना आज पुन्हा वाढ झाली आहे. यामुळे चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन गरजेचे आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply