Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

काळजी घ्या ः कोरोना बाधितांचा आकडा वाढला

श्रीगोंदा टॉपवर । शुन्यावर असलेले जामखेड 4 वर तर भिंगार शुन्यावर

अहमदनगर । वीरभूमी- Nov 02, 2021 • 02:02 PM 1737 views
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी घटत चालल्याने दिलासा मिळत असतांनाच आज मंगळवारी एकुण आकडेवारीत वाढ झाली आहे. आज मंगळवारी जिल्ह्यात एकुण 144 कोरोना बाधित आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये चढउतार सुरूच आहे. सोमवारी कोरोना बाधितांचा आकडा शंभरच्या आत म्हणजे 88 वर होता. मात्र आज मंगळवारी यामध्ये 56 ने वाढ झाली आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये श्रीगोंदा तालुका टॉपवर असून येथील आकडेवारी 29 वर आली आहे. श्रीगोंद्याबरोबरच इतर ठिकाणच्या आकडेवारीतही काहीशी वाढ झाली आहे. मात्र आज शुन्यावर असलेल्या जामखेड तालुक्यांची आकडेवारी 4 वर आली आहे. तर भिंगारची आकडेवारी आज पुन्हा शुन्यावर आली आहे.

आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 66, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 41 तर अँटीजेन चाचणीत 37 असे 144 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- श्रीगोंदा 29, राहुरी 14, राहाता 13, नगर शहर 12, कोपरगाव 10, पारनेर 10, कर्जत 8, संगमनेर 8, नगर ग्रामीण 7, शेवगाव 6, नेवासा 5, इतर जिल्हा 5, पाथर्डी 5, अकोले 4, जामखेड 4, श्रीरामपूर 4 असे कोरोना बाधित आढळून आले.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत चढउतार कायम आहे. यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply