Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

दिलासादायक ः नगर जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने

सर्व तालुके 15 च्या आत । श्रीगोंदा, पारनेर एक अंकी तर संगमनेर, पाथर्डी शुन्यावर

अहमदनगर । वीरभूमी- Nov 03, 2021 • 03:00 PM 1688 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत मोठी घट झाली असून नगरकरांना मोठा दिलासा मिळत आहे. आज बुधवारी जिल्ह्यात एकुण 96 कोरोना बाधित आढळले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये चढउतार सुरूच असून आज मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी बाधितांच्या आकडेवारीत वाढ झाली होती. मात्र आज आकडेवारीत मोठी घट झाली आहे.

विशेष म्हणजे नेहमी टॉपवर असलेल्या संगमनेरचा आकडा आज प्रथमच शुन्यावर आला आहे. तर पाथर्डी, मिलटरी हॉस्पिटल येथील आकडेवारीही शुन्यावर आली आहे. तसेच श्रीगोंदा, पारनेरची आकडेवारीही अनुक्रमे 5 व 6 अशी आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वात जास्त आकडेवारी नगर शहराची असून ती 15 इतकी आहे. त्याखालोखाल नेवासा, अकोले, राहाता अशी क्रमवारी लागत आहे. तर इतर ठिकाणची आकडेवारी 7 पेक्षा कमी आहे.

आज बुधवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 21, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 48 तर अँटीजेन चाचणीत 27 असे 96 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 15, नेवासा 13, अकोले 11, राहाता 11, नगर ग्रामीण 7, पारनेर 6, जामखेड 5, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 5, कर्जत 4, इतर जिल्हा 4, शेवगाव 4, भिंगार 2, कोपरगाव 2, राहुरी 2 असे कोरोना बाधित आढळून आले. तर पाथर्डी, संगमनेर, मिलटरी हॉस्पिटल येथील आकडेवारी शुन्यांवर आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आटोक्यात असला तरी नारिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply