Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अहमदनगर विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर

अहमदनगर विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर

अहमदनगर । वीरभूमी- Nov 09, 2021 • 03:32 PM 2239 views
राज्यातील सात विधान परिषदेसह अहमदनगर विधान परिषदेचे आमदार अरुणकाका जगताप यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022 रोजी संपुष्टात येत आहे. यामुळे रिक्त होणार्‍या जागेसाठी राज्यातील सात विधान परिषद मतदार संघात निवडणूक जाहीर करण्यात आली होती.

मात्र स्थानिक प्राधिकरणामध्ये कार्यरत असलेल्या मतदारांपैकी 75 टक्केपेक्षा कमी मतदार असल्याने अहमदनगर व सोलापूर विधानपरिषदेची निवडणूक होणार नाही. मात्र इतर पाच ठिकाणच्या विधान परिषदेसाठी निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विधान परिषद निवडणूक लांबणीवर गेल्याने इच्छुकांना चांगली तयारी करण्यास मोठा वेळ मिळणार आहे.

राज्यातील मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदूरबार, अकोला-बुलढाणा-वाशिम, नागपूर, सोलापूर व अहमदनगर अशा सात विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022 रोजी संपत आहे. या रिक्त होणार्‍या जागेसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यकाळ जाहीर केला आहे. मात्र यामधून सोलापूर व अहमदनगर विधान परिषद मतदार संघाला वगळले आहे.

याबाबत निवडणूक आयोगाने मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदूरबार, अकोला-बुलढाणा-वाशिम, नागपूर या मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

यानुसार 16 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे. 24 नोव्हेंबर रोजी दाखल अर्जाची छाननी, 26 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेणे तर दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर दि. 14 डिसेंबर रोजी मतदान मोजणी होणार आहे.

सात पैकी इतर पाच विधान परिषदेसाठी निवडणूक होत असून सोलापूर व अहमदनगर विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांना मतदारांना संपर्क करण्यास मुबलक वेळ मिळणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply