Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

काळजी घ्या ः कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय

नगर ग्रामीण टॉपवर । दुसर्‍यास्थानी श्रीगोंदा तर राहुरी तिसर्‍या स्थानावर

अहमदनगर । वीरभूमी- Nov 11, 2021 • 02:32 PM 2208 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा मागील आठवड्यात शंभरच्या आत आला होता. मागील आठ दिवस कमी होत असलेला बाधितांच्या आकड्यामध्ये आज गुरुवारी वाढ झाली आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात एकुण 110 कोरोना बाधित आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे.

मागील काही दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारीत घट होत होती. मात्र आज गुरुवारी पुन्हा एकुण बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर ग्रामीणची आकडेवारी टॉपवर आहे. मात्र हा आकडा 12 असल्याने काहीअंशी दिलासा मिळत आहे. त्याखालोखाल श्रीगोंदा, राहुरी, राहाताचा क्रमांक लागतो. तर बुधवारी शुन्य संख्या असलेल्या संगमनेरचा आकडा 9 वर आला आहे.

मात्र सर्वच ठिकाणची आकडेवारी 12 च्या आतमध्ये असल्याने काहीअंशी दिलासा मिळत आहे. मात्र आकडा कमी असला तरी बुधवारच्या तुलनेत एकुण आकडेवारीत वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

काल बुधवारपर्यंत जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 677 वर आली आहे. तर कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 7 हजार 78 वर पोहोचली आहे. त्यातच आता पुन्हा कोरोना बाधितांचा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 36, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 48 तर अँटीजेन चाचणीत 26 असे 110 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर ग्रामीण 12, श्रीगोंदा 12, राहुरी 11, राहाता 10, नगर शहर 9, संगमनेर 9, श्रीरामपूर 9, शेवगाव 8, कर्जत 7, पाथर्डी 6, इतर जिल्हा 5, नेवासा 4, अकोले 3, पारनेर 3, जामखेड 1, कोपरगाव 1 असे कोरोना बाधित आढळून आले. तर भिंगार, इतर राज्य व मिलटरी हॉस्पिटल येथील आकडेवारी शुन्यांवर आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आटोक्यात असला तरी नारिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply