Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

ज्ञानेश्वर कारखान्याची एफआरपी जाहीर

स्वाभिमानी शेतकरी संघटना व कारखाना प्रशासनाची बैठक

नेवासा । वीरभूमी- Nov 13, 2021 • 02:08 PM 4181 views
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना प्रशासनाने यावर्षी गाळपासाठी येणार्‍या उसाला 2411 रुपये प्रतिटानाप्रमाणे एफआरपी जाहीर केली आहे. याबाबत कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ. पांडूरंग अभंग यांनी घोषणा केली आहे.

भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने यावर्षीची एफआरपी जाहीर करावी म्हणुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाना प्रशासनाशी चर्चा करून निवेदन दिले होते. यावेळी झालेल्या चर्चेत साधक बाधक चर्चा होऊन कारखान्याच्या वतीने 2411 रुपये प्रमाणे एफआरपी जाहीर केली.

यावेळी कारखान्याचे संचालक माजी आ. चंद्रशेखर घुले, कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग व स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, बाळासाहेब फटांगरे, संतोष गायकवाड, संदीप मोटकर, प्रशांत भराट, रावसाहेब लवांडे, अशोक पावसे, भाऊ बैरागी, मच्छिंद्र आर्ले, माऊली मुळे, चंद्रकांत सरगड, नारायण पायघन, अशोक भोसले, अमोल देवढे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी बैठकीत यावर्षी गाळपासाठी येणार्‍या ऊसाची एफआरपी जाहीर करावी, वजन काटा, कार्यक्षेत्रातील ऊस तोडण्यास प्राधान्य द्यावे, अतिवृष्टी व पूराने नुकसान झालेल्या ऊसाची प्राधान्याने तोडणी करावी. ऊस वाहतूक करणार्‍या ट्रक्टर चालकांना टेप रेकॉर्डचा आवाज कमी ठेवण्याबाबत सुचना द्याव्यात. तसेच ऊस वाहतूक करणार्‍या वाहनाच्या पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर लावावे, अशा मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी कारखान्याच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य करत या हंगामात 2411 रुपये प्रमाणे एफआरपी जाहीर केली. याबाबतची घोषणा कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग यांनी केली.

एफआरपीची घोषणा करताच स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादकांमधून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply