Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

कर्जतच्या स्थानिक राजकारणात धुराळा

कर्जतमध्ये शिंदे-विखे यांची कसोटी तर आ. पवार यांची व्हिजनची लढाई

डॉ. अफरोजखान पठाण । वीरभूमी- Nov 27, 2021 • 04:25 PM 1010 views
कर्जत ः कर्जत नगरपंचाय निवडणुकीचा बिगुल वाजला. ही निवडणूक म्हणजे माजीमंत्री राम शिंदे यांच्या कसोटीची तर आ. रोहित पवार यांच्या व्हिजनची लढाई मानली जात आहे. मात्र यामध्ये काँग्रेसची त्यात खासकरून घुले बंधूंची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे.

सध्या तरी भाजपा एकला चलो रे तर आ. पवार महाविकास आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करीत आहेत. मात्र यात मान-सन्मान महत्वाचा मुद्दा राहील यात काडीमात्र शंका नाही. शुक्रवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांची जिल्हा बँक संचालकपदी राष्ट्रवादीच्या कोट्यातून निवड आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या बॅकफूटचे कारण घडेल काय? हे थोड्याच दिवसात समजणार आहे.

कर्जत नगरपंचायतीमध्ये या पंचवार्षीकला सर्वच प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा दिला असला तरी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. सध्या तरी माजी मंत्री राम शिंदे आणि खा. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाची एकला चलो रे ची भूमिका पुढे येत आहे. तर आ. रोहित पवार राज्याच्या समिकरणानुसार महाविकास आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करीत आहेत.

भाजपाने केलेली विकासकामांचे मुद्दे पुढे करून त्यात महत्वाचा कर्जत शहराचा सोडवलेला पाणीप्रश्न यावर निवडणूक केंद्रीत करून जनतेसमोर जाण्याची व्युहरचना करीत आहेत. तर महाविकास आघाडी राज्यात आपले सरकार असून शहरातील राहिलेले सामाजिक प्रश्न दर्जेदार आणि तातडीने सोडविण्यात येतील, यावर लक्ष केंद्रीत करून पुढे येतील. आ. पवार आपल्या विकासकामांच्या यादीनुसार सर्वसामान्य जनतेला मतदानाचे आवाहन करतील यात शंका नाही. मात्र त्यांना त्यापूर्वी महाविकास आघाडी अभेद्य ठेवण्याची कसरत पार पाडावी लागणार आहे.

शिवसेना मानसन्मानाच्या मुद्यावर अगोदरच नाराज असून काँग्रेस जागावाटपात आपल्याला थोरला भाऊ या नात्याने संख्याबळ मागेल. यात महत्वाची भूमिका घुले बंधूंची राहील. घुले बंधूनी पैलवान चषक आणि कालच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात आपले राजकीय वजन दोन्ही वजनदार राजकीय पदाधिकार्‍यांना दाखवत आपल्याकडे लक्ष वेधले आहे. यासह यंदाच्या निवडणुकीत त्यांची भूमिका केंद्रबिंदू राखण्यात आजमितीस तरी यश मिळवले आहे.

मागील निवडणुकीत भाजप 12, काँग्रेस 4 आणि अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल होते. मात्र यंदा भाजपाचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याने भाजपास नवीन आणि जुने यांची सांगड घालत तुल्यबळ उमेदवार ठरवावे लागणार आहेत. यात माजीमंत्री राम शिंदे आणि खा. सुजय विखे यांना एकत्रित आ. पवारांचा सामना करावा लागणार आहे. तर आ. पवार यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष असणारे शिवसेनाला सोबत घेत जागावाटपाचा तिढा सोडवत महाविकास आघाडी करून भाजपाशी चार हात करावे लागतील.

17 जागेत ते कोणाला कसा न्याय देतील हे पाहणे रंजक ठरणार आहे. हे करीत असताना त्यांना आपल्याच पक्षातील इच्छुक आणि भावी असणार्‍यांना त्यागाची भूमिका द्यावी लागली तर ती नाराजी जिल्हा बँकेची पुनरावृत्ती करणारी ठरू नये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या सभेत कुरघोड्या करणार्‍याना इशारा दिल्याने ते देखील सतर्कच राहतील.

काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच युवक मेळावा घेत सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीमध्ये आपला स्वबळाचा नारा दिला होता. कर्जत शहरात घुले बंधूंचे वर्चस्व आहे. त्यांना मानणारा युवकवर्ग आणि त्यांच्यावर स्नेह ठेवणारा सर्वसामान्य माणसाचा मोठा गट त्यांच्या जमेची बाजू आहे.

सध्या तरी त्यांची भूमिका समतोल राखण्याचा त्यांनी पुरेपूर केला असला तरी मागील दोन महिन्यात राम शिंदे आणि प्रवीण घुले यांची चार वेळा झालेली भेट वेगळे समीकरण तयार करीत आहे. त्यास दोन्ही नेत्यांनी दुजोरा दिला नसला तरी ऐनवेळी त्यांची मैत्रीपूर्ण लढत होण्याची दाट शक्यता राहील. मात्र काल पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आ. रोहित पवार यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांना जिल्हा बँकेत स्थान देत काँग्रेस सोबत राहिल असा इशारा दिल्याने आगामी काळात कर्जतच्या स्थानिक राजकारणात धुराळा उडणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.

आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जागेचा तिढा सुटून महाविकास आघाडी झाली तरी पदाधिकारी निवड कळीचा मुद्दा राहणार आहे. मित्रपक्ष असणारे काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघ राष्ट्रवादीस सोडत त्याग केला होता. त्याची भरपाई स्थानिक निवडणुकीत काँग्रेस वरिष्ठ पद आपल्याकडे ठेवू शकते अशी प्रतिक्रिया एका काँग्रेसच्या पदाधिकार्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली. तर जुनी राष्ट्रवादी आणि पक्षांतर करून सामील झालेले नवी राष्ट्रवादी कसा ताळमेळ ठेवून आपली जागा कायम राखतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply