Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

तहसील कार्यालयाच्या गेटसमोरच तरुणाने घेतला गळफास

शेवगाव तहसील समोरील घटना । आत्महत्येचे कारण अस्पष्ट

शेवगाव । वीरभूमी- Nov 30, 2021 • 10:04 AM 5615 views
शेवगाव तहसील कार्यालयाच्या लोखंडी गेट समोर असलेल्या लिंबाच्या झाडाला दोराच्या साह्याने गळफास घेऊन तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव भाऊसाहेब घनवट (वय 25, रा. नजिक बाभूळगाव) असे आहे. या घटनेने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आज मंगळवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी शेवगाव तहसील कार्यालयाच्या लोखंडी मुख्य गेट लगत असलेल्या लिंबाच्या झाडाला एका तरुणाने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. लिंबाच्या झाडाला तरुणाचा मृतदेह लटकत असल्याचे पाहिल्यानंतर शेवगाव पोलिसांना कळविण्यात आले.

घटनेची माहिती कळताच शेवगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी आण्णा पवार व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत लिंबाच्या झाडावरून मृतदेह खाली उतरून घेतला. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव भाऊसाहेब घनवट (वय 25, रा. नजिक बाभूळगाव, ता. शेवगाव) असे असून तो कापसाचा व्यापार करत असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. पोलिसांनी नातेवाईकांना कळविले आहे. नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल, असे सांगण्यात आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply