Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

ऑनलाइन गुंतवणुकीचे आमिषाने कोट्यावधींचा गंडा

नेवाशाचा सोमनाथ राऊतसह 7 जणांवर गुन्हा । ‘बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीत गुंतवणूक

अहमदनगर । वीरभूमी - Dec 05, 2021 • 10:01 AM 595 views
ऑनलाईन गुंतवणुकीवर रोज 300 ते 1,500 रुपये कमिशन देण्याचे आमिष दाखवून नेवासा तालुक्यातील एकाने राज्यभरातील अनेकांना सुमारे 40 ते 50 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्यांपैकी काही जणांनी शनिवारी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सोमनाथ एकनाथ राऊत (38, रा. पाथरवाला, ता. नेवासा, हल्ली रा. माऊली रेसिडेन्सी, पाईपलाईन रोड, सावेडी) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी राऊत याच्यासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत समजलेली हकीगत अशी की, पाथरवाला (ता. नेवासा) येथील सोमनाथ राऊत याने डिसेंबर 2019 मध्ये ‘बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कंपनी स्थापन करून ‘फंड पे’ नावाचे वॉलेट सुरू केले. या कंपनीअंतर्गत तो नागरिकांना मोबाइल, डिश टीव्हीचे रिचार्ज, पतसंस्था, कंपन्या यांना ऑनलाईन बिल पेमेंट करण्याची सुविधा देत होता. तसेच याद्वारे आरटीजीएस, एनएफटी व्यवहार करण्याची सेवाही दिली जात होती. याद्वारे लोकांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने लोकांना ऑनलाईन गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यास सुरुवात केली.

1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर प्रतिदिन 300 ते 1,500 रुपये कमिशन मिळेल, असे आमिष राऊत याने दाखवले. यासाठी ‘फंड पे’ मोबाइल अ‍ॅपही सुरु केले. त्याद्वारे जवळपास 50 लाख रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. तसेच कमीत कमी 500 ते 1 हजार रुपयांची गुंतवणूक सुविधाही त्याने उपलब्ध केली. त्याच्याकडे एकूण साडेचार लाख लोकांनी गुंतवणूक केली असल्याची माहिती फिर्यादी सतीश बाबुराव खोडवे (रा. कागल, जि. कोल्हापूर) यांनी दिली आहे. त्यामुळे ही गुंतवणूक सुमारे 40 ते 50 कोटींपर्यंत असू शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे.

29 ऑगस्ट 2021 पासून राऊत बेपत्ता असल्याचे सतीश खोडवे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. राऊत बेपत्ता झाल्याचे कळताच इतर ठेवीदारांनी एकत्रित येत तोफखाना पोलिस ठाण्यात धाव घेतली. शनिवारी दुपारी खोडवे, असलम शफीक शेख (रा. विळद), शेखर (पुणे) यांच्यासह मुंबईहून एक महिला तक्रार देण्यास आली होती. पोलिसांनी सोमनाथ राऊत, त्याची पत्नी व कंपनीची डायरेक्टर सोनिया सोमनाथ राऊत हिच्यासह वंदना पालवे (केडगाव), सुप्रिया आरेकर (बुर्‍हाणनगर), प्रितम शिंदे (पुणे), प्रीती शिंदे (दिल्लीगेट), शॉलमन गायकवाड (रा. पाईपलाई रोड, नगर) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियमासह विश्वासघात व फसवूक, संगनमत करणे, आदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

जाहीरातींना भूलले ग्राहक
कॉर्पोरेट ऑफिस व जाहिरातींना भुलले : फसवणूक झालेल्यांपैकी अनेकांनी आपण बिग मी इंडिया कंपनीची वाहिन्यांवर जाहिराती पाहिल्या. त्यात गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल, असे सांगितले होते. तसेच अ‍ॅपवरही माहिती दिलेली होती. जाहिरातीत होर्डिंगवर पुण्यातील कॉर्पोरेट ऑफिस दाखवले होते. त्यामुळे आपला या कंपनीवर विश्वास बसला, असे सांगितले. या कंपनीत फसवूक झालेल्यांनी पोलिसांकडे माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

फसवणूकबाबत अनेक जिल्ह्यातून तक्रारी
आरोपी सोमनाथ राऊत याने ऑनलाईन गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. या फसवणुकीबाबत शनिवारी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आलेल्या सतीश खोडवे यांनी ही संख्या सुमारे साडेचार लाख असल्याचे सांगितले आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये अहमदनगरसह, औरंगाबाद, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, नागपूर, उस्मानाबाद, मुंबई येथील जवळपास 50 जणांचे अर्ज पोलिसांनी स्वीकारले आहेत.

राऊत याने नगरमधील दोन खासगी बँकांमध्ये कंपनीच्या नावाने खाती सुरू केली. या खात्यामध्ये सोमनाथ राऊत याने ग्रहाकांना पैसे भरण्यास सांगितले होते. त्यामुळे पोलिस या बँकांकडेही चौकशी करणार आहेत. गुंतवणूक केलेल्यांपैकी कुणाला पैसे परत मिळाले की नाही, हे समजू शकले नाही. मात्र, ज्यांची फसवणूक झाली, त्यांनी वारंवार राऊत याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याने प्रतिसाद दिला नाही.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply