Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

जोरदार शक्ती प्रदर्शन करीत भाजपचा निवडणूक प्रचार शुभारंभ

विद्यमान आमदारांनी 12 कोटी सोडा एकही रुपया नगरपंचायतला आणला नाही ः वैभवराव पिचड

अकोले । वीरभूमी- Dec 15, 2021 • 09:43 PM 856 views
भाजप व आरपीआय युतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अकोले नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी विविध वक्त्यांनी विद्यमान आमदारांवर निष्क्रीयतेचा आरोप करीत टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडीच्या नावाखाली राष्ट्रवादी, शिवसेना काँग्रेस या पक्षांनी जो घोळ घातला त्याची विविध वक्त्यांनी खिल्ली उडवली. आघाडी असूनही एकाच प्रभागात आघाडीच्या तीनही पक्षांचे उमेदवार उभे आहेत. राज्यात आघाडीचे असे उदाहरण अभूतपूर्व असल्याचा टोला यावेळी लगावण्यात आला.

अकोले नगर पंचायतच्या भाजपा व आरपीआय युतीच्या प्रचाराचा शुभारंभ माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे शुभहस्ते गुजरी बाजार येथे करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यापारी सुभाष कोळपकर हे होते.

यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड, सौ. हेमलताताई पिचड, जि. प. सदस्य कैलासराव वाकचौरे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ, जालिंदर वाकचौरे, गिरजाजी जाधव, अ‍ॅड. के. डी. धुमाळ, आरपीआयचे नेते विजयराव वाकचौरे, जे. डी. आंबरे, भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, अ‍ॅड. वसंतराव मनकर, यशवंतराव आभाळे, चंद्रकात सरोदे, शांताराम संगारे, कल्पनाताई सुरपुरीया, सुधाकर देशमुख, परशराम शेळके, भाजपा अल्पसंख्याक राज्याचे शब्बीरभाई शेख, जिल्हा भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष असिफ पठाण, मुख्याद्यापक राजु अत्तार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रारंभी सागर चौधरी, सौ. प्रतिभाताई मनकर, सोनालीताई नाईकवाडी, शैलाताई घोडके, मैनुद्दीन शेख, बाळासाहेब वडजे, शितल वैद्य, अनिल नाईकवाडी, तमन्ना शेख, सचिन शेटे, माधुरी शेणकर, कविता शेळके या उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला.

माजी मंत्री पिचड म्हणाले की, आमदारांनी कालव्याचे म्हाळादेवी जलसेतुच्या एका पाईप हलविण्याचे कामासाठी सर्वपक्षीय आंदोलन केले व एक महिन्यात काम करुन पाणी देवु असा शब्द दिला होता. त्याला चार महीने होऊन गेले तरी अद्याप पाण्याचा तपास नाही. तालुक्यात आमदार बदलता येईल, मात्र अकोले तालुका वगळून गेलेला रेल्वेमार्ग बदलता येणार नाही.तालुक्यातील देवठाणहुन जाणारा रेल्वेमार्ग आता साकुर मार्गे नेला जात आहे. हा आमदारांचा नाकर्तेपणाचा आसल्याची टीका त्यांनी केली.

माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले की, अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी आपण दिलेले सर्व उमेदवार उच्चशिक्षित, सुशिक्षित आहेत. कुणावरी कसलाही गुन्हा दाखल नाही, सर्व जण चारित्र्य संपन्न उमेदवार आहेत. मागील कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला. कोविड काळात शहरातील व्यापार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक व्यापार्‍यांचे खाली दुकान असते व वरच्या मजल्यावर ते राहतात. बाहेरून घरात येतांना दुकानाचे शटर थोडे खाली राहिले तरी पाच - दहा हजारांच्या पुढे दंड करण्यात आला. अशी जुलमी दंड आकारणी होत असतांना आमदारांनी एखादा फोन करून प्रशासकाला व्यापार्‍याना मदत करण्याच्या सूचना केल्या नाहीत. व्यापार्‍यांना दिलासा दिला नाही. कोरोनाच्या संकट काळात कार्यकर्त्यांनी सामाजिक संस्थानी, शिक्षकांनी लोकवर्गणीतून कोविड सेंटर उभारले मात्र आमदार म्हणून यांनी कोरोना काळात काय काम केले असा सवाल त्यांनी केला.

मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, ओ.बी.सी. आरक्षण यावर एक शब्दही न काढणार्‍या आमदारांनी विधानसभेत साधा एक प्रश्नही विचारला नाही. 40 वर्षात विकास झाला नाही, असे विरोधक म्हणतात. मग तुम्ही तालुक्यातील धरणांचे जलपूजन कसे करतात? ही धरणे कोणी केली असा सवाल केला. विद्यमान आमदारांनी 12 कोटीचे सोडा एक ही रुपया अकोले नगरपंचायतसाठी आणलेला नाही.

भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ यांनी महाविकास आघाडीवर आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार टीकास्त्र सोडले. ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत मी होतो ती शिवसेना आता राहिली नाही. ही शिवसेना आता लाचार सेना झाली असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच कोणत्या गायीचे वासरू कोणाला पिते हेच समजेना अशी टीका विरोधकांवर त्यांनी केली. जालिंदर वाकचौरे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी असतांना विधान परिषदेच्या निवडणुकीत 6 पैकी 4 जागा भाजपच्या आल्या आहेत असे सांगत पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचा आढावा घेतला. आरपीआय नेते विजयराव वाकचौरे यांनी राज्यात दलित महिलांवर अत्याचार होत असून राज्यसरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असल्याची टीका केली.

तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे म्हणाले की, दूध संघाचे रिबेट व अगस्ती कारखान्यामुळे अकोलेची बाजारपेठ फुलली असल्याचे सांगितले. प्रथम नगराध्यक्ष अ‍ॅड. के. डी. धुमाळ यांनी नगरपंचायतच्या विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी सोमेश्वर उर्फ बबलू धुमाळ, आरपीआय नेते चंद्रकांत सरोदे, शांताराम संगारे, ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव, रमेशराव धुमाळ, प्रथम नगराध्यक्ष अ‍ॅड.के. डी. धुमाळ, अ‍ॅड. वसंतराव मनकर, माजी नगरसेवक परशराम शेळके, राजू अत्तार, श्री. क्षीरसागर आदींनी आपली मनोगते व्यक्त करून भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हितेश कुंभार यांनी केले तर राहुल देशमुख यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply