Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

नगराध्यक्षांनी भाजल्या भाकर्‍या

शेटे मळ्यातील दत्त जयंती निमित्त आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमात सहभाग

अकोले । वीरभूमी - Dec 19, 2021 • 10:14 PM 1376 views
अकोले शहरातील शेटे मळा येथील श्रीक्षेत्र दत्त देवस्थान येथे दरवर्षी दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी काल्याचे किर्तनानंतर मेथीची भाजी व भाकरी अशा महाप्रसादाचे आयोजन करण्याची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. तात्पुरती चुल करुन भाकरी करण्याचे काम महीला सेवेकरी मनोभावे या ठिकाणी करीत असतात.

यावर्षी या सोहळ्याला संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी अकोले येथील शेटे मळा येथील श्रीक्षेत्र दत्त देवस्थानला भेट दिली. दरम्यान महाप्रसादासाठी महिला भाकरी करत असल्याचे पाहुन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनीही चुलीजवळ बसून भाकर्‍या भाजण्यासाठी महिलांची मदत केली.

त्यांचे समवेत अकोले नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा सौ. संगीता शेटे, मंदाताई नवले, वनिता शेटे, गीता शेटे यांच्यासह शेटे मळ्यातील महीला सहभागी झाल्या होत्या.

सौ.दुर्गाताई तांबे भाकरी भाजताना पाहून शेटे मळ्यातील महिला खूप भारावून गेल्या होत्या. सौ.तांबे या पण अतिशय या गोष्टीचा आनंद घेताना दिसत होत्या.

नेहमीच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात नेहमी असणारी धावपळीने हा आनंद घेता येत नाही. मात्र यौगायोगाने आध्यत्मिक व ग्रामीण क्षेत्रातील जीवनाचा आनंद मिळाला, याचे समाधान त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होते.

अगदी ग्रामीण भागातील माहेरवासिन स्वतःच्या घरी येऊन घरातील आई, भगिनी बरोबरचा आनंदी अनुभव घेतला व साधी राहणीमान असलेल्या दुर्गाताई यांना आपल्यात बसून भाकरी भाजताना मदत करतांना पाहुन शेटे मळ्यातील महिलाही भारावून गेल्या होत्या.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply