Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

मनमाड- बेळगाव महामार्गावरील कोळगाव येथे अपघात

श्रीगोंदा । वीरभूमी- Dec 24, 2021 • 11:04 PM 978 views
मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथील विसापूर फाट्यानजीक बुलेट मोटारसायकल (एमएच. 12-के. डब्लू. 7877) व विना नंबरच्या स्विफ्ट कारच्या धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघातात महंमद शफी शाफुद्दिन शेख (वय 50 वर्षे) त्यांची पत्नी शबाना महंमद शफी शेख (वय 45 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी महंमद शफी शेख यांचा नगर येथे रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. मयत दाम्पत्य लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी आहेत.

याबाबत शेख असिफ समशेर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लोणी व्यंकनाथ येथील शफीक शेख हे पत्नीसोबत दुचाकीवरून नगरच्या दिशेने जात असताना विसापूर फाट्याजवळ नगरकडून दौंडच्या दिशेने जाणार्‍या विना नंबरच्या स्विफ्ट डिझायर चारचाकी गाडीने भरधाव वेगाने नगरच्या दिशेने जाणार्‍या बुलेट मोटारसायकल (एम. एच. 12 के. डब्लू. 7877) ला दि.24 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास समोर समोर जोराची धडक दिली.

या धडकेत बुलेट गाडी वरील महंमद शफी शफुद्दिन शेख (वय 50 वर्षे) रा. लोणी व्यंकनाथ यांची पत्नी शबाना महंमद शफी शेख (वय 45 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर महंमद शफी शेख यांचा नगर येथे रुग्णालयात नेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे, सहाय्यक फौजदार मधुकर सुरवसे, कर्मचारी कोळपे हे घटनास्थळी दाखल झाले.

या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात शेख आसिफ समशेर यांच्या फिर्यादीवरून विना नंबरच्या मारुती स्विफ्ट गाडीच्या अज्ञात चालकावर ठाणे अमालदर आर. टी. शिंदे यांनी गुन्हा दाखल करून घेतला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply