Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेततळ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

कामाला सुट्टी असल्याने शेततळ्यावर फेरफटका मारायला गेले होते । दोघेघी परप्रांतीय

श्रीगोंदा । वीरभूमी- Jan 02, 2022 • 10:56 PM 852 views
श्रीगोंदा शहराजवळ आनंदकर मळ्यातील शेततळ्यावर सेल्फीच्या नादात तळ्यात पाय घसरून पडल्यामुळे दोन परप्रांतीय तरुणांचा रविवार दि. 2 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास बुडून मृत्यू झाला आहे. या दुःखद घटनेमुळे शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मूळ राजस्थानी फर्निचर कारागीर असलेले सुरेंद्रकुमार हारडू (वय 18 वर्षे) व लक्ष्मण ओमनाथ (वय 17 वर्षे 9 महिने) हे दोन तरूण रविवारी अमावास्या असल्यामुळे कामावर सुट्टीला होते.

आनंदकर मळ्यात फिरायला गेल्यावर तेथील शेततळ्यात मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह झाला. त्यांच्याबरोबर अजून दोघेजण सहकारी तरुण होते. त्यातील सुरेंद्रकुमार व लक्ष्मण हे दोघे सेल्फी काढत असताना एकाचा तोल जाऊन तळ्यात पडला.

त्याला वाचवण्यासाठी दुसर्‍या तरुणाने तळ्यात उडी मारली. पोहता येत नसल्याने दोघे बुडू लागल्याने वर उभ्या असणार्‍या तरुणांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला व लोक जमा झाले परंतु तोपर्यत या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस हवालदार संदीप शिरसाठ यांनी भेट दिली. पुढील तपास शिरसाठ करत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply