Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

गटविकास अधिकार्‍यांच्या घरावरच चोरट्यांचा डल्ला

शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल । चोरीच्या घटनांमध्ये वाढ

शेवगाव । वीरभूमी - Jan 03, 2022 • 09:18 PM 2359 views
शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके बाहेर गावी गेले असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून दागीने लंपास केले. ही चोरीची घटना रविवारी (दि. 2) रोजी दुपारी गटविकास अधिकारी महेश डोके हे घरी आले असता ही घटना त्यांच्या लक्षात आली. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

गटविकास अधिकारी डोके हे शहरातील शुभम मंगल कार्यालयाशेजारी कुटूंबियांसमवेत राहतात. कामानिमीत्त ते कुटूंबासह त्यांच्या मुळगावी भुतवडा (ता. जामखेड) येथे दि. 28 डिसेंबर रोजी घर बंद करुन गेले होते. रविवार (दि. 2) रोजी ते दुपारी चारच्या सुमारास घरी आले असता दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.

त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला असता तेथील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटातील बाँक्समध्ये ठेवलेले चार ग्रॅम वजनाचे 15 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण त्यांना आढळून आले नाही. घरात इतरही वस्तुंची उचकापाचक केल्याचे दिसून आले.

याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात येवून अज्ञात चोरटयांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील व शहरातील नागरीक चोरीच्या घटनांनी नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. त्यातच चोर्‍यांचा तपास लागण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. असे असताना चोरट्यांनी अधिकार्‍यांच्या घरास लक्ष्य केल्याने खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply