Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

कोरोना बाधितांचा आकडा वाढताच

नगर शहरासह राहाता, श्रीगोंदा टॉपवर

अहमदनगर । वीरभूमी- Jan 04, 2022 • 03:23 PM 2026 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांमध्ये आज मंगळवारी 50 ने भर पडली आहे. सोमवारच्या तुलनेत आजच्या आकडेवारीत 3 ने वाढ झाली आहे. आजही कोरोना बाधितांचा आकडा वाढताच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये अहमदनगर शहरासह राहाता, श्रीगोंदा येथील आकडेवारी सर्वाधिक आहे. मात्र हा आकडा 8 च्या आत असल्याने काही अंशी दिलासा मिळत आहे. दुसर्‍या क्रमांकावर इतर जिल्हा आहे.

सोमवारी शुन्यावर असलेले अकोले व कोपरगावमध्ये आज अनुक्रमे 2 व 3 असे कोरोना बाधित आढळले आहेत. तर आज आढळलेल्या बाधितांमध्ये जामखेड, कर्जत, राहुरी, भिंगार व मिलटरी हॉस्पीटल येथील कोरोना बाधितांचा आकडा शुन्यांवर आहे.

आज मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमधील तपासणीत 2, खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 42 तर रॅपिड अँन्टिजेन चाचणी अहवालात 6 असे एकुण 50 कोरोना बाधित आढळले आहेत.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 8, राहाता 8, श्रीगोंदा 8, इतर जिल्हा 5, कोपरगाव 3, संगमनेर 3, इतर राज्य 3, अकोले 2, नेवासा 2, शेवगाव 2, श्रीरामपूर 2, पाथर्डी 2, नगर ग्रामीण 1, पारनेर 1 असे कोरोना बाधित आढळून आले. तर जामखेड, कर्जत, राहुरी, भिंगार व मिलटरी हॉस्पीटल येथील आकडेवारी शुन्यांवर आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी जास्त होत असल्याने नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply