Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

कर्जत तालुक्यातील सहा गावांना मिळणार 25 लाखांचा निधी

आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून श्यामाप्रसाद मुखर्जी येजनेत समावेश

कर्जत । वीरभूमी- Jan 07, 2022 • 04:12 PM 1423 views
राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखड्याअंतर्गत वने व वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्रालगतच्या गावामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन ‘जन-वन विकास’ साधण्यासाठी शासनाने ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास’ योजना सुरु केली आहे.

या योजनेसाठी कर्जत तालुक्यामधील 6 गावांची पुणे वन्यजीव विभागांतर्गत निवड करण्यात आली आहे. यामध्ये बिटकेवाडी, चखालेवाडी, कोंभळी, खांडवी, थेरगाव चांदे खुर्द, म्हाळंगी या गावांचा समावेश आहे.

कर्जत जामखेडचे आ रोहित पवार यांनी वेळोवेळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी या योजनेत आपल्या मतदारसंघातील गावांचा समावेश व्हावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यानुसार मतदारसंघातील 6 गावांचा समावेश करण्यात आला असून प्रत्येक गावासाठी 25 लाख रुपयांचा निधी या योजनेंतर्गत मंजूर झाला आहे.

कर्जत तालुक्यासाठी एकूण दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासह अजून 4 गावांचा या योजनेत समाविष्ट करण्यात यावी यासाठी आ रोहित पवार प्रयत्नशील आहेत. त्यासंदर्भातील प्रस्तावही रेहेकुरी वन्यजीव कार्यालय व पुणे वन्यजीव विभाग यांच्यातर्फे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

याबाबत ग्रामस्थांनी आ. पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेचा गावकर्‍यांची वनावरील निर्भरता कमी करून शेतीला पूरक असे जोडधंदे निर्माण करणे तसेच मानव व वन्य प्राण्यांतील संघर्ष कमी करणे, वन व वन्य जीवांचे संरक्षण करणे हा मूळ उद्देश आहे.

या योजनेत कर्जत तालुक्यातील गावांचा समावेश झाल्यामुळे आता तालुक्यातील वन व्यवस्थापनाचा दर्जा तर उंचावेल शिवाय पर्यायी रोजगार देखील उपलब्ध होण्यास मदत होईल.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply