Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

नगर जिल्ह्याची चिंता कायम

नगर शहराचा आकडा वाढताच । दुसर्‍या स्थानी नगर ग्रामीण तर तिसर्‍या क्रमांकावर कोपरगाव

अहमदनगर । वीरभूमी- Jan 10, 2022 • 03:07 PM 2099 views
अहमदनगर जिल्ह्यात आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीत थोडीशी घट झाली आहे. मात्र आज आढळलेल्या बाधितांचा आकडा 244 असल्याने चिंता कायम आहे.

मागील पाच दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतांना आज सोमवारी 28 ने घट झाली आहे. यामुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहराचा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये दुसर्‍या स्थानी नगर ग्रामीणचा क्रमांक लागतो. तर तिसर्‍या स्थानी कोपरगावचा क्रमांक लागतो. आज मिलटरी हॉस्पिटल येथील आकडेवारी शुन्यांवर आली आहे. तर नगर शहर, नगर ग्रामीण, संगमनेर, इतर जिल्हा, पारनेर, कर्जत, नेवासा येथील आकडेवारीत वाढ झाली आहे.

मागील सहा दिवसात तब्बल 1182 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे सक्रीय रुग्ण संख्येचा आकडा रविवार पर्यंत 1093 एवढा होता. या आकडेवारीत आजही मोठी वाढ होणार असल्याने चिंता वाढली आहे.

आज सोमवारी अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमधील तपासणीत 43, खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 167 तर रॅपिड अँन्टिजेन चाचणी अहवालात 34 असे एकुण 244 कोरोना बाधित आढळले आहेत.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 84, नगर ग्रामीण 24, कोपरगाव 19, इतर जिल्हा 18, संगमनेर 13, अकोले 12, श्रीरामपूर 12, पाथर्डी 11, पारनेर 10, राहाता 10, नेवासा 7, श्रीगोंदा 7, राहुरी 6, भिंगार 4, कर्जत 3, इतर राज्य 2, जामखेड 1, शेवगाव 1 असे कोरोना बाधित आढळून आले. तर एकमेव मिलटरी हॉस्पिटल येथील आजची रुग्ण संख्या शुन्यांवर आहे.

मागील तीन दिवसापासून एकुण आकडेवारीने दोनशेचा आकडा पार केला आहे. या तुलनेत डिस्चार्ज होणार्‍या रुग्णांची कमी असल्याने चिंता वाढली आहे. यामुळे नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply