Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

नगर जिल्ह्यात कोरोना विस्फोट

काळजी घ्या । जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दुप्पटी वाढू लागला

अहमदनगर । वीरभूमी- Jan 11, 2022 • 02:09 PM 2821 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज मंगळवारी नगर जिल्ह्यात तब्बल 408 कोरोना बाधित आढळले आहेत. नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दुप्पटी वाढू लागल्याने चिंता वाढत आहे.

मागील आठवड्यापासून कोरोना बाधितांचा आकडा वाढतचा असून गेल्या सात दिवसात तब्बल 1590 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या सोमवार पर्यंत 1306 एवढी होती. यामध्ये आज पुन्हा मोठी भर पडणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मागील आठवड्यात सोमवार दि. 3 जानेवारी रोजी उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 346 एवढी होती. यामध्ये तब्बल चौपट वाढ झाल्याने हा आकडा सोमवार पर्यंत 1590 एवढा झाला आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये अहमदनगर शहराने शंभरचा आकडा पार करत उच्चांक गाठला आहे. दुसर्‍या स्थानी राहाता तर तिसर्‍या स्थानी इतर जिल्ह्याची आकडेवारी आहे. आज सुमारे सर्वच ठिकाणच्या आकडेवारीत मोठी वाढ झाल्याने चिंता वाढली आहे.

आज मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमधील तपासणीत 156, खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 174 तर रॅपिड अँन्टिजेन चाचणी अहवालात 78 असे एकुण 408 कोरोना बाधित आढळले आहेत.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 126, राहाता 48, इतर जिल्हा 41, नगर ग्रामीण 39, श्रीरामपूर 18, अकोले 17, पारनेर 17, कोपरगाव 16, संगमनेर 15, शेवगाव 15, जामखेड 10, श्रीगोंदा 9, मिलटरी हॉस्पिटल 8, पाथर्डी 8, कर्जत 5, इतर राज्य 4, राहुरी 4, भिंगार 4, नेवासा 4 असे कोरोना बाधित आढळून आले.

वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता वाढली असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply