Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

बोधेगाव शाळा खोल्याप्रकरणी आणखी दोन अधिकार्‍यांचे निलंबन

ग्रामविकास अधिकारी व शाखा अभियंत्याचा समावेश

बोधेगाव । वीरभूमी- Jan 15, 2022 • 06:29 PM 3187 views
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील जिल्हा परिषदेच्या दोन वर्ग खोल्या जिल्हा परिषदेची जागेवर न बांधता इतर ठिकाणी केल्याने शिक्षण विस्ताराधिकार्‍यासह केंद्रप्रमुखांचे निलंबन करण्यात आले होते. या प्रकरणात आणखी दोन जणांचे निलंबन करण्यात आले आहे.

यामध्ये ग्रामविकास अधिकारी राजाराम काटे व लघू पाटबंधारे उपविभागाचे शाखा अभियंता जयेंद्र जिजासाहेब पट्टे या दोन अधिकार्‍यांचा समावेश आहे. या प्रकरामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिते अशी की, बोधेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मंजूर असलेल्या दोन वर्ग खोल्या जिल्हा परिषदेच्या जागेऐवजी विनापरवानगी इतरत्र बांधण्यात आल्या. याप्रकरणी बोधेगाव येथील काही ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केल्यानंतर शिक्षण विस्ताराधिकारी रामनाथ कराड व केंद्रप्रमुख रामराव ढाकणे यांचे तात्पुरते निलंबन करण्यात आले आहे.

या शाळा खोल्या प्रकरणात आणखी दोन अधिकार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये बोधेगावचे ग्रामविकास अधिकारी राजाराम काटे व लघु पाटबंधारेचे शाखा अभियंता जयेंद्र जिजासाहेब पट्टे यांचे निलंबन केले आहे. यामुळे निलंबन केल्या अधिकार्‍यांची संख्या चार झाली आहे.

ग्रामविकास अधिकारी राजाराम काटे यांनी दि. 29 फेब्रुवारी 2020 रोजी ग्रामपंचायतीचा मासिक ठराव 5/2 हा नियमबाह्य केलेला असून महाराष्ट्र शासनाची जागा असतांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नावे नियमबाह्य ठराव केल्याचे जिल्हा परिषद कार्यालयाला कळवले आहे. यावरुन जिल्हा परिषद सेवा वर्तवणूक नियम 1967 चा नियम 3 चा भंग केलेला असल्याने त्यांचे निलंबन केले आहे.

तर शेवगाव पंचायत समितीचे लघु पाटबंधारे उपविभागाचे शाखा अभियंता जयेंद्र जिजासाहेब पट्टे यांनी देखील बोधेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करिता दोन वर्ग खोल्यांचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या जागेऐवजी विनापरवानगी इतर मालकीच्या जागेवर बांधकाम करणेकामी रेखांकन करून अनियमितता केलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियम 1967 चा नियम 3 चा भंग केलेला आहे. त्यानुसार पट्टे व काटे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

बोधेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन दोन शाळा वर्ग खोल्यांचे मंजूर झाल्यानंतर ते विनापरवानगी जिल्हा परिषदेची जागा सोडून इतरत्र खागसी मालकीच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम केले. त्याबाबत बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे यांनी तक्रार केली होती. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचा झालेला खर्च निधी वाया गेेला आहे.

निलंबन झाल्यानंतर या कालावधीत तिघांचे मुख्यालय हे नेवासा तालुका करण्यात आले आहे. तर बोधेगाव येथील ग्रामविकास अधिकारी राजाराम काटे यांचे मुख्यालय हे कोपऱगाव करण्यात आले आहे. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply