Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा मोठा विस्फोट

नगर शहराची वाटचाल तिनशेच्या दिशेने । राहाता शतक पार

अहमदनगर । वीरभूमी- Jan 16, 2022 • 02:00 PM 2076 views
मागील काही दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दुप्पटीने वाढत आहे. आज रविवारी जिल्ह्यात तब्बल 847 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे नगरकरांची चिंता वाढली आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहराचा उच्चांक कायम असून शहराची वाटचाल तिनशेच्या दिशेने सुरू आहे. तर राहाता तालुका शंभरी पार गेला आहे. त्याचप्रमाणे अपवाद वगळता इतर ठिकाणच्या आकडेवारीतही मोठी वाढ झाली आहे.

मागील काही दिवसापासून वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या आकड्यामुळे नगर जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या बाधितांची संख्या शनिवारी 3461 एवढी होती. आजचा बाधितांचा आकडा पाहता आजही अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या चार हजार पार जाण्याचा अंदाज आहे.

आज रविवारी अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमधील तपासणीत 318, खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 387 तर रॅपिड अँन्टिजेन चाचणी अहवालात 142 असे एकुण 847 कोरोना बाधित आढळले आहेत.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 280, राहाता 109, अकोले 62, श्रीरामपूर 52, नगर ग्रामीण 48, भिंगार 47, कोपरगाव 36, इतर जिल्हा 34 राहुरी 29, पारनेर 28, संगमनेर 27, श्रीगोंदा 26, पाथर्डी 23, नेवासा 17,जामखेड 9, मिलटरी हॉस्पिटल 8, कर्जत 3, इतर जिल्हा 6, शेवगाव 3 असे कोरोना बाधित आढळून आले.

कोरोना रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply