Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोरोना बाधितांबरोबरच जिल्ह्याची चिंता वाढली

नगर शहराच्या आकडेवारीत घट । इतर ठिकाणच्या आकडेवारीत वाढ

अहमदनगर । वीरभूमी- Jan 19, 2022 • 02:40 PM 1965 views
दिवसेंदिवस अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होत आहे. आज बुधवारी अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 1247 कोरोना बाधित आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये अहमदनगर शहराची आकडेवारी थोडीशी घटली असली तरी इतर ठिकाणची आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे. आज आढळेल्या बाधितांमध्ये काही तालुक्यात दुपटीने वाढ झाली आहे. यामध्ये पाथर्डी, शेवगाव तालुक्यासह इतर तालुक्याचा समावेश आहे.

दररोज वाढत असलेल्या कोरोना बाधित आकड्यामुळे चिंता वाढत चालली आहे. यामुळे मंगळवार पर्यंत जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या 5926 वर पोहोचला होता. आजही मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळल्याने अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या साडेसहा हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत आहे. यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.

आज बुधवारी अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमधील तपासणीत 666, खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 292 तर रॅपिड अँन्टिजेन चाचणी अहवालात 289 असे एकुण 1247 कोरोना बाधित आढळले आहेत.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 425, राहाता 110, श्रीरामपूर 83, पाथर्डी 73, श्रीगोंदा 73, पारनेर 63, इतर जिल्हा 55, कोपरगाव 49, शेवगाव 49, नगर ग्रामीण 49, नेवासा 42, राहुरी 39, अकोले 34, जामखेड 34, मिलटरी हॉस्पिटल 34, संगमनेर 17, भिंगार 7, इतर राज्य 6, कर्जत 5 असे कोरोना बाधित आढळून आले.

कोरोना रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply