Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

आ. आशुतोष काळे यांना मिळाला राज्यमंत्री पदाचा दर्जा

पदाच्या माध्यमातून शिर्डीचा उत्कर्ष व मतदार संघाचा विकास करण्याची ग्वाही

कोपरगाव । वीरभूमी- Jan 19, 2022 • 04:18 PM 2059 views
श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असून महाविकास आघाडी सरकारने त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करीत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला आहे.

काही महिन्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची 16 सप्टेंबर 2021 रोजी निवड करून विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांची निवड केली होती.

विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे व विश्वस्त मंडळाने यांनी तदर्थ समितीचे अध्यक्ष,प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांच्याकडून पदभार घेतला आहे. तेव्हापासून आ. आशुतोष काळे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्री साईबाबा संस्थानचा कार्यभार पाहत आहे.

आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साईबाबा संस्थानचा कारभार सुरळीतपणे सुरु आहे. त्याबाबत महाविकास आघाडी सरकारने समाधान व्यक्त केले आहे. श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे. परंतु आ.आशुतोष काळे यांना आजपर्यंत राज्यमंत्रीपदाचा दर्जा अधिकृतपणे देण्यात आलेला नव्हता.

त्याबाबत महाविकास आघाडी सरकारने अधिसूचना जाहीर करून श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष असलेल्या आ.आशुतोष काळे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल केला आहे.

त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले असून मिळालेल्या राज्यमंत्रीपदाच्या माध्यमातून शिर्डी संस्थानचा उत्कर्ष व मतदार संघाचा विकास साधणार असल्याचे म्हटले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply