Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

हल्लेखोरांना पकडण्यात शेवगाव पोलिस अपयशी

हल्लेखोरांना पकडण्यात शेवगाव पोलिस अपयशी

शेवगाव । वीरभूमी - Jan 28, 2022 • 12:12 PM 1672 views
शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे भरचौकात शनिवारी सकाळी 10 वाजता दुचाकीवरून आलेल्या चौघा जणांनी एका तरूणांवर गोळीबार केला होता. या घटनेमध्ये तरुणासह एक वाटसरू जखमी झाला होता. मात्र या घटनेला उद्या शनिवारी आठ दिवस होतील मात्र हल्लेखोरांचा तपास लावण्यात पोलिसांना अद्यापही अपयश आले आहे.

यामुळे शेवगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहीले असून तालुक्यातील गुन्हेगारी व अवैध धंद्याचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

चापडगावात भरचौकात दुचाकीवरून आलेल्या चौघा हल्लेखोरांनी दोन गावठी कट्ट्यांतून परमेश्वर पातकळ याच्यावर गोळीबार केला होता. यामध्ये एक गोळी परमेश्वर पातकळ याच्या हाताला चाटून गेल्याने तो जखमी झाला होता. तर दुसरी गोळी रस्त्यावरून जाणार्‍याच्या खांद्याला चाटून गेल्याने तो जखमी झाला होता.

घटनेनंतर काही वेळातच शेवगावचे पोलिस निरिक्षक प्रभाकर पाटील हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र तो पर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. याबाबत परमेश्वर पातकळ याच्या फिर्यादीवरून काकासाहेब वैद्य व पप्पू ऊर्फ शिवहरी दराडे या दोघांसह अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मात्र पोलिसांनी यापैकी हल्लेखोरांनी ज्या वैद्य यांचे नाव घेऊन हल्ला केला त्यांना अटक केली. मात्र हल्ला करणारे शिवहरी दराडे व इतर अज्ञात तिघे अद्यापही पसार आहेत. त्यांच्या तपासासाठी दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले आहेत. मात्र अजूनही त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

पोलिसांनी तपासात फिर्यादीसह प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोनदवले आहेत. घटनास्थळावरून गोळीबार केल्यानंतर तेथे पडलेल्या दोन पुंगळ्या सापडल्या आहेत. यामुळे हल्लेखोरांनी दोन गावठी कट्ट्यांतून परमेश्वर पातकळ याच्यावर हल्ला केल्याचे स्पष्ट होत आहे. हल्लेखोरांकडे असलेल्या गावठी कट्ट्यांमुळे शेवगाव तालुक्यात आणखी गावठी कट्टे बाळगणार्‍यांची संख्या मोठी असल्याचा संशय आहे. असे असेल तर शेवगाव तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था कशी आबाधित राहील? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या गोळीबार प्रकरणाचा तपास पोनि. प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. रवींद्र बागुल हे करत आहेत.

अवैध धंद्यांना कोणाचे अभय?
शेवगाव शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. शहरातील चौकांचौकात मटका खेळणार्‍यांची गर्दी पहायला मिळते. गुटखा बंदी असतांनाही पानटपर्‍यांवर गुटखा मिळतो. वेश्या व्यवसाय, अवैध दारु वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचप्रमाणे गोदावरी नदी पात्रात पाणी असल्यामुळे वाळू तस्करांनी गोदावरी नदीच्या उपनद्यांमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू केला आहे. याकडेही महसूल प्रशासनासह पोलिस प्रशासनाने डोळेझाक केल्याचे पहायला मिळत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply