Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघासाठी 7 कोटी 77 लाखांचा निधी

आ. मोनिका राजळे; मतदारसंघातील साठवण बंधारे, पाझर तलावाची होणार दुरुस्ती

शेवगाव । वीरभूमी- Jan 28, 2022 • 04:44 PM 1350 views
शेवगाव, पाथर्डी तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. यावेळी नद्यांना मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरामुळे साठवण बंधारे, कोल्हापूर टाईप बंधारे, सिमेंट नाला बांध तसेच पाझर तलाव यांचे अतोनात नुकसान झाले. यांची तातडीने दुरुस्ती होणेसाठी जलसंधारण विभागाला सूचना केल्या. याप्रमाणे प्रादेशिक जलसंधारण विभाग, नाशिक यांनी मतदारसंघातील 81 दुरुस्ती कामांचा प्रस्ताव शासनास सादर केला.

याकामी जलसंधारण मंत्री यांच्याकडे सातत्याने कामाचा पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री जलसंधारण योजने अंतर्गत मृद व जलसंधारण विभागांतर्गत मतदारसंघात 7 कोटी 77 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये शेवगाव तालुक्यातील 5 कोटी 25 लाख रुपयांचे तर पाथर्डी तालुक्यातील 2 कोटी 52 लाख रुपयांचे कामांचा समावेश असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

यावेळी त्या म्हणाल्या, या दुरुस्तीच्या कामांमध्ये पाथर्डी तालुल्यातील येळी, भुतेटाकळी- 2 कामे, कोळसांगवी, कोरडगाव-2 कामे, खेर्डे, मालेवाडी, मिडसांगवी, मोहोज, पागोरी पिंपळगाव, प्रभुपिंपरी-2 कामे, शेकटे-3 कामे, अकोला-6 कामे, सुसरे-2 कामे, भालगाव, सोनोशी, सोमठाणे नलवडे-3 कामे, दुलेचांदगाव, चिंचपूरइजदे, मोहटे, तिनखडी-3 कामे, पाथर्डी (वनेश्वर), भवरवाडी, मिडसांगवी, पिंपळगव्हाण-2 कामे, हाकेवाडी, रुपनरवाडी, मुंगसवाडे या गावांचा समावेश आहे.

तसेच शेवगाव तालुक्यातील वडुले -6 कामे, मलकापूर, वरूर-2 कामे, सुकळी, खरडगाव-2 कामे, ठाकुर पिंपळगाव-3 कामे, लाडजळगाव, मडके, भगूर, आखेगाव, अंतरवाली बुद्रुक-3 कामे, लखमापुरी-2 कामे, हातगाव 2 कामे, चेडेचांदगाव-4 कामे, सुळे पिंपळगाव-2 कामे, मुरमी-2 कामे, लोळेगाव, सुकळी, ढोरजळगाव-2 कामे या गावांतील दुरुस्तीचे कामांचा समावेश आहे.

जलसंधारण विभागाचे दिनांक 27 जानेवारी रोजीचे शासन निर्णय क्र. मुजयो -2022/प्र.क्र.-21/जल-1 व मुजयो -2022/प्र.क्र.-24/जल-1 प्रमाणे मतदारसंघातील साठवण बंधारे, कोल्हापूर टाईप बंधारे, सिमेंट नाला बांध तसेच पाझर तलाव दुरुस्तीसाठी 7 कोटी 77 लाख रुपयांचा भरीव निधीस प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे आमदार मोनिका राजळे यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply