Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

उसाच्या फडात ढाकणेंकडून चटणी-भाकरीचा आस्वाद

ऊस तोडणी कामगारांसोबत ऋषिकेश ढाकणे यांचे भोजन

पाथर्डी । वीरभूमी - Feb 06, 2022 • 01:29 AM 2401 views
संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांनी टाकळीमानूर परिसरातील ऊसाच्या फडात ऊस तोडणी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तोडणी कामगारांच्या आग्रहावरून ऊसाच्या फडात चटणी-भाकरीचा आस्वाद घेतल्याने कामगारही हरखून गेले.

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ऋषिकेश ढाकणे यांचा टाकळीमानूर येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर उपस्थित ग्रामस्थांनी ऊसाच्या संदर्भात अनेक विषय मांडले. टाकळीमानूर परिसरात ऊस उत्पादकांच्या मागणीवरून मागील आठ दिवसांपासून केदारेश्वर कारखान्याने ऊस तोडणीसाठी कामगारांच्या टोळ्या पाचारण केल्याने या परिसरातील ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळत आहे.

अशाच एका ऊसाच्या शेतात ढाकणे यांनी भेट देत ऊस तोडणी कामगारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व कारखान्याकडून आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना कामगारांनी माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्या तोडणी कामगारांच्या संघर्षाबाबत उल्लेख करीत, आज ज्या सुविधा व कष्टाचा मोबदला आम्हाला मिळतोय त्याला बबनराव ढाकणे यांचा ऊस तोडणी कामगारांसाठीचा केलेला संघर्ष व लढा कारणीभूत असल्याचे सांगितले.

ज्या घटकाला कारखानदारांच्या पिळवणुकीतून पोटाची खळगी भरावी लागायची त्याविरोधात बबनरावांनी उभारलेला लढा व आम्हाला न्याय व सन्मान मिळवून दिल्याबद्दल कामगारांनी ऋषिकेश ढाकणे यांच्याकडे कृतज्ञतापूर्वक सांगितले.

यानंतर ऋषिकेश ढाकणे यांनी कोयता हातात घेत ऊसही तोडला व कामगारांच्या आग्रहावरून ऊसाच्या फडातच बसकण मांडत कामगारांसोबत ‘चटणी-भाकरी’ चा आस्वाद घेतला.

यावेळी बोलताना ऋषिकेश ढाकणे म्हणाले, केदारेश्वर कारखाना ऊस तोडणी कामगारांच्याच मालकीचा असून यंदापासून कारखान्याची गाळप क्षमता वाढविल्याने फारशा गळीताच्या अडचणी येत नाहीत. कारखाना कार्यक्षेत्र व बाहेरील असे मिळून जवळपास सहा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट बाळगून असून शेतकी विभागाने व्यवस्थित नियोजन केल्याने नोंदीनुसार ऊस तोडणी सुरु आहे.

यावेळी राजेंद्र नागरे, दादासाहेब बारगजे आदी हजर होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply