Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

नगरकरांना मोठा दिलासा

कोपरगावात सर्वाधिक रुग्ण । राहाता दुसर्‍यास्थानी

अहमदनगर । वीरभूमी- Feb 22, 2022 • 03:43 PM 659 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस घटत चालल्याने नगरकरांना मोठा दिलासा मिळात आहे. आज मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यात एकुण 70 बाधित आढळले आहेत. मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा घटत असल्याने दिलासा मिळत आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये कोपरगाव तालुका सर्वोच्चस्थानी असून येथील आकडा 26 वर आहे. दुसर्‍या स्थानी राहाता तालुक्याचा क्रमांक लागतो. तर इतर ठिकाणची आकडेवारी 7 च्या आत आली आहे.

तसेच अकोले, भिंगार, जामखेड, नगर ग्रामीण, इतर राज्य, संगमनेर या ठिकाणची आकडेवारी शुन्यावर आढळली आहे. यामुळे नगरकरांना मोठा दिलासा मिळत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात सोमवार पर्यंत उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 1464 एवढी आहे. तर आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा 7216 एवढा झाला आहे.

आज मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमधील तपासणीत 3, खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 51 तर रॅपिड अँन्टिजेन चाचणी अहवालात 16 असे एकुण 70 कोरोना बाधित आढळले आहेत.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- कोपरगाव 26, राहाता 20, नगर शहर 7, राहुरी 3, शेवगाव 3, कर्जत 2, इतर जिल्हा 2, श्रीरामपूर 2, मिलटरी हॉस्पिटल 1, नेवासा 1, पारनेर 1, पाथर्डी 1, श्रीगोंदा 1 असे कोरोना बाधित आढळून आले. तर अकोले, भिंगार, जामखेड, नगर ग्रामीण, इतर राज्य, संगमनेर या ठिकाणची आकडेवारी शुन्यांवर आहे.

कोरोना बाधितांचा आकडा घटला असला तरी प्रत्येक नागरिकाने काळजी घेण्याची गरज आहे. यामुळे प्रत्येक नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply