Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

राज्यात शनिवारपासून ढगाळ वातावरण

बुधवार व गुरुवार रोजी पावसाचा अंदाज । नगर जिल्ह्यात या तालुक्यात पडणार पाऊस

अहमदनगर । वीरभूमी- Mar 17, 2022 • 10:37 PM 4386 views
राज्यात मार्च हिट नंतर शनिवार दि. 19 मार्च पासून आठवडाभर ढगाळ वातावरण असणार आहे. तर 20 मार्च ते 25 मार्च या कालावधीत दररोज भाग बदलून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

शेतकर्‍यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहनही हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी केले आहे.

मागील काही दिवसापासून उष्णता वाढत असल्याने लाही लाही होत होती. मात्र शनिवार दि. 19 मार्च ते 26 मार्च पर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर रविवार दि. 20 मार्च पासून दररोज भाग बदलून पाऊस पडणार आहे.

रविवार दि. 20 मार्च पासून कोल्हापूर, पाटण, पुणे, पणजी, सावंतवाडी आदी भागात पाऊस पडणार आहे. अशी माहिती वीरभूमीला दिली आहे.

तसेच बुधवार दि. 23 मार्च ते शुक्रवार दि. 25 मार्च या दरम्यान सांगली, पुणे, कराड, विटा, इस्लामपूर, रत्नागिरी, चिपळून, खेड, वाई, सातारा, इगतपुरी, नाशिक, सिन्नर, निफाड, येवला, वणी यासह अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव व पारनेर या काही भागात पडणार आहे.

तर उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे. ज्या भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे तेथील शेतकर्‍यांनी द्राक्ष, बेदाणा, गहू, हरभरा, ज्वारी, मका, टमाटे आदी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहनही हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply