Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

कळसूबाईच्या पायथ्याशी भरले पहिले डांगी जनावरांचे प्रदर्शन

कळसुबाई यात्रेनिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन

अकोले । वीरभूमी - Apr 29, 2022 • 11:20 PM 1972 views
आदिवासी भागाचे आणि सह्याद्रीच्या कातीव कड्यांचे वैभव असलेले डांगी पशुधन म्हणजे या भागाचे वैभव आहे. महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या जहागीरदार वाडी या टुमदार व निसर्गसुंदर गावांमध्ये तीन दिवसीय डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामदैवत असलेल्या कळसुबाई यात्रेनिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई येथील एएसके फाउंडेशन व बायफ संस्था पुरस्कृत समृद्ध किसान प्रकल्प, सदस्य व ग्रामस्थ जहागीरदार वाडी तसेच गोविंदराव खाडे प्रतिष्ठान, कळसुबाई यात्रा उत्सव समिती जागीरदार वाडी यांच्या संयुक्त विद्यमाने डांगी जनावरांचे राज्यस्तरीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

या प्रदर्शनाचा मुख्य हेतू डांगी जनावरांच्या संगोपना विषयी तंत्रशुद्ध माहिती परिसरातील शेतकर्‍यांना करून देणे. दर्जेदार डांगी पैदास व संवर्धन करणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान करणे. डांगी जनावरांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा होता. अकोले आणि इगतपुरीच्या सीमारेषेवर असलेल्या या गावांना डांगी जनावरांच्या व्यापारासाठी विशेष महत्त्व आहे. प्रदर्शनाचे हे प्रथम वर्ष होते.

या प्रदर्शनासाठी घोटी, इगतपुरी, राजूर, कोतुळ, समशेरपुर, सिन्नर इत्यादी भागातून मोठ्या प्रमाणावर डांगी जनावरे प्रदर्शनात आली होती.

शेतकर्‍यांना अन्ना तंगी पशुधन व्यवस्थापन व पैदास याविषयी तांत्रिक माहिती व्हावी तसेच स्थानिक जैवविविधता संवर्धन यांचे महत्त्व समजावे यासाठी बायफच्या वतीने यात्रेदरम्यान प्रदर्शन भरवण्यात आले होते. या भागातील आदिवासी बांधव डांगी जनावरांचा वापर डोंगर उतारावरील शेती फुलवण्यासाठी उपयोग करत असतात.

या भागातील डोंगर उतारावरील शेती कसण्यासाठी डांगी प्रजातीचे बैल योग्य पर्याय ठरत असल्याने या प्रजातीस मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या बाजारात सर्वात मोठी बोली लागलेली जोडी दोन लाख रुपयांची होती.

या प्रदर्शनामध्ये सुमारे 60 ते 70 लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. येत्या काळात या प्रदर्शनाला राज्यस्तरीय बनवण्यासाठी ग्रामस्थांचे लक्ष असणार आहे. या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी बायफ संस्थेच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी विशेष योगदान दिले. प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरलेल्या गंभीरेवाडी येथून आलेल्या विठ्ठल सोमा गंभीरे यांच्या बैलजोडीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य ठरला तो बारी गावातून आणलेला गणेश तातळे या यांचा 70 किलो वजनाचा बोकड. अतिशय रुबाबदार आणि देखण्या या बोकडाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सरपंच वैशाली खाडे, उपसरपंच चंद्रभान खाडे, पंढरीनाथ खाडे, हिरामण खाडे, रविंद्र खाडे, अंकुश करटुले, यशवंत खाडे, बाळू घोडे आणि बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे, पशुवैद्यकीय विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, वनविभाग यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply