Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

भरधाव कंटेनरची अ‍ॅपे रिक्षाला धडक

सहा प्रवाशी ठार; चारजण जखमी

कोपरगाव । वीरभूमी- May 06, 2022 • 12:04 PM 1788 views
भरधाव कंटेनरने रिक्षाला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात कोपरगाव तालुक्यताल डाऊच खुर्द परिसरातील झगडे फाटा ते कोपरगाव महामार्गावर घडला.

घटनेची माहिती कळताच कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. या अपघातात मयत झालेल्यांमध्ये दोन विद्यार्थींनीसह दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश असल्याचे समजते.

मयताची नावे आत्माराम जम्मानसा नाकोडे (वय 65, रा. वावी, ता. सिन्नर), राजाबाई साहेबराव खरात (वय 60, रा. चांदेकसारे, ता. कोपरगाव), शिवाजी मारुती खरात (वय 52), शैला शिवाजी खरात (वय 42, दोघे रा. श्रीरामपूर), पुजा नानासाहेब गायकवाड (वय 20, रा. हिंगणवेढे), प्रगती मधुकर होन (वय 20, रां चांदेकसारे, ता. कोपरगाव) अशी आहेत.

तर विलास साहेबराव खरात (वय 34), कावेरी विलास खरात (वय 5, दोघे रा. चांदेकसारे), रुपाली सागर राठोड (वय 40), धृव सागर राठोड (वय 17, दोघे रा. सिन्नर), तर दुचाकीवरील दिगंबर चौधरी (वय 42) व त्यांचा मुलागा सर्वेश दिगंबर चौधरी (वय 12), कृष्णाबाई गोविंद चौधरी (वय 42, तिघे रा. पोहेगाव, ता. कोपरगाव) हे जखमी झाले.

याबाबत समजलेली माहिती अशी की, कोपरगाव ते मनमाड महामार्गावरील झगडे फाटा येथून अ‍ॅपे रिक्षा प्रवाशी घेऊन कोपरगावकडे जात होती. दरम्यान रिक्षा पगारे वस्ती जवळ आली असता कोपरगावहुन भरधाव वेगाने येत असलेल्या कंटेनरने रिक्षाला जोराची धडक दिली.

या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला असून रिक्षामधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या भरधाव कंटेनरने दोन दुचाकींनाही धडक दिल्याने दुचाकी चालकही जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती कळताच कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply