Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

श्रीगोंद्यात आजपासून तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम

मुख्याधिकारी मंगेश देवरे यांची माहिती । पोलिस फौजफाटा तैनात

श्रीगोंदा । वीरभूमी - May 25, 2022 • 08:00 AM 1517 views
श्रीगोंदा शहरात बुधवार दि. 25 मे ते दि. 28 मे या कालावधीत मुख्य रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याची माहिती श्रीगोंदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दिली आहे.

नगरपरिषद हद्दीतील जामखेड-दौंड रस्ता, मांडवगण रस्ता, शनिचौक ते जोधपूर मारुती चौक रस्ता व वडाळी रस्ता या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवली जाणार आहेत. अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत हटवण्याचा निर्धार पालिकेने केला आहे.

अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यासाठी दंगल नियंत्रण पथकासह जवळपास 50 ते 60 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अतिक्रमण हटवण्याबाबत श्रीगोंदा नगरपरिषदेने वर्तमानपत्रात जाहीर नोटीस दिली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून अनेक छोट्या व्यवसायिकांनी व विक्रेत्यांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

बुधवारपासून राबवण्यात येणार्‍या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असून यात मोठ्या व्यवसायिकांना अभय आणि छोट्या व्यवसायिकांवर अन्याय होत असल्याची भावना अनेक छोट्या टपरीधारक व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

शहरात अनेक मोठ्या व्यावसायिकांची तर आजी-माजी आमदार, आजी-माजी नगरसेवक व अनेक प्रभावशाली राजकीय नेत्यांची अतिक्रमणे आहेत. नगरपरिषदेने आधी बड्यांवर कारवाई करावी आम्ही निमुटपणे आमची अतिक्रमणे काढू व आम्हाला आधी पर्यायी व्यवस्था निर्माण करून द्यावी, असे मत अनेक छोट्या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

तर अतिक्रमण हटवल्यामुळे शहराचा श्वास मोकळा होणार असून वाहतुकीस होणारा अडथळा दूर होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply